प्रेरणादायी

मृत्युनंतरही बाप लेकीचे अनोखं औदार्य

नेत्रदान : पाटील कुटुंबीयांवर समाजमनाची कौतुकाची थाप

मृत्युनंतरही बाप लेकीचे अनोखं औदार्य

नेत्रदान : पाटील कुटुंबीयांवर समाजमनाची कौतुकाची थाप

अमरावती

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा धनोडीच्या मुख्याध्यापिका सुनिता पाटील ह्यांचा शनिवारी (दि.१२) शाळेत जातांना चारचाकी वाहनाचा अपघात झाला. श्रीमती पाटील यांना अमरावती मधील खाजगी रुग्णालयात भरती केले असता तीन दिवसाच्या महतप्रयत्ननंतर जीवनदान मिळण्यास यश आले नाही, अखेर दिनांक १४ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर लगेच पाटील कुटुंबीयांनी सुनिता पाटील यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला. या प्रेरणादायी निर्णयामुळे सुनिता पाटील ह्या त्यांच्या मृत्यू नंतरही त्यांचे डोळे इतरांना दृष्टी देण्यासाठी सहाय्य करणार आहे. शोकाकुल परिस्थितीत घेतलेल्या ह्या निर्णयाने समाजमनाने त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत आहे.

दिनांक १२ एप्रिल रोजी चांदर रेल्वे- वर्धा मार्गावरील सातेफळ फाट्यानजिक मारुती स्विफ्ट गाडीचा पोलला धडक अपघात घडला. या अपघातात सुनिता पाटील यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात शरीरातील अनेक अवयवांना मार बसल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. तब्बल दोन दिवस हा रक्तस्त्राव झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्त पुरवठा करावा लागला. शिक्षण क्षेत्रातील अनेक लोकांनी स्वयंस्फुर्तीने सलग दोन दिवस रक्तदान केल्याने मोठ्या प्रमाणावर रक्त पुरवठा उपलब्ध झाला.

शरारीत रक्त पुरवठा पूर्ववत होण्यासाठी पुणे येथील डॉ.प्रतिक वाढोकर, नागपूरचे डॉ. शिशिर रावेकर, रिम्सचे डॉ. सुयोग राठी यांच्या वैद्यकीय चमूने शर्तीचे प्रयत्न केले. दोन दिवसांनंतर प्रकृती स्थिर होण्याच्या मार्गावर असताना दिनांक १४ एप्रिलला दुपारच्या वेळेस पुन्हा प्रकृतीत अस्वस्थता वाढायला लागली. अखेर सायंकाळी साडेसहा नंतर सुनिता पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्व. सुनिता किरण पाटील.

संकल्प देहदानाचा नेत्रदान पूर्णत्वास :

सुनिता पाटील ह्या शिक्षण क्षेत्रात महिला संघटनेचे नेतृत्व करत होत्या. सुनिता पाटील ह्यांनी मृत्यूपूर्वी देहदानाचा संकल्प केला होता. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे असल्याने मृत्यूनंतर सुध्दा त्यांची स्मृती व योगदान राहावे याकरिता किरण पाटील व मुलगी तनुश्री पाटील ह्यांनी त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला. अपघाताने अनेक आंतरिक अवयवाला दुखापत झाल्याने अंतिम समयी केवळ नेत्रदान करण्यात आले. अमरावती येथील दिशा फाऊंडेशनद्वारा त्यांचे नेत्रदानाचा संकल्प पूर्णत्वास नेण्यात आला.

मुलगी तनुश्री भडाग्नी देताना

मुलीने दिला भडाग्नी

हिंदू धर्मातील अनेक पारंपरिक चालीरीती काळानुरूप बदलून नवीन प्रथा प्रस्थापित होत आहे. आपल्या जिवलग सहकारी मैत्रिणीचे अंतिम दर्शन घेण्याकरिता शिक्षण क्षेत्रातील अनेक भगिनींनी स्मशानभूमीच्या परिसरात प्रवेश करून साश्रू नयनांनी निरोप घेतला. पाटील दाम्पत्याला तनुश्री नावाची एकुलती एक मुलगी असल्याने आईच्या पार्थिवाला तनुश्रीने भडाग्नी दिला. अखेर दुपारी अडीचच्या सुमारास हिंदू स्मशान भूमीत त्यांचे शरीर अनंतात विलीन झाले. यावेळी हजारो लोकांची उपस्थिती होती.

 

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

One Comment

  1. In the silence of this sorrowful time, they’ve shown a kind of love, humility, and grace that touches the soul. Even in pain, their heart has remained open—offering kindness, gratitude, and strength. It’s a living testament to the beautiful soul their mother was. She didn’t just raise someone strong—she raised someone full of light. May her soul rest in eternal peace, and may that light continue to shine through them always. 🙏💔

Leave a Reply to Vedant Rajendra Holey Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close