पाखरांसाठी धान्याचे झुंबर
पाखरांसाठी धान्याचे झुंबर
बदलत्या काळात चिमण्यांची संख्या घटत आहे. शहरामध्ये हे प्रकर्षाने दिसून येते. यावर उपाययोजना म्हणून चिमण्यांच्या संवर्धनासाठी आंध्रप्रदेश मधील पोलूवर्ती धालीनायडू या सेवानिवृत्त शिक्षकाने पारंपारिक धान्यांचे झुंबर तयार केले आहे. धालीनायडू सर ‘हरित विकास फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत ‘वारूकुंचलू’ प्रकारचे धान्याचे झुंबर तयार करतात. ‘वारूकुंचलू’ म्हणजे धान्यांची वेणी. शाळेत हिंदी विषयाचे शिक्षक असताना सुपाराम नावाचा व्यक्तीपासून प्रेरित होऊन त्यांचाकडून ही कला त्यांनी अवगत केली. सेवानिवृत्ती नंतर ह्या शिक्षकाने पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला स्वतःला वाहून घेतले आहे. आता ते पूर्णवेळ पक्षी संवर्धन व समाजात जनजागृती करत आहे.
पक्ष्यांना खायला धान्य मिळाले तर त्यांची संख्या वाढते. त्यामुळे धान्याच्या अश्या वेण्या तयार करण्याची कला ते इतरांना पण शिकवू लागले. या वारुकुंचलूमुळे केवळ चिमण्या नव्हे तर मैना, पोपट, तसेच खारूताईंना अन्न मिळते. सध्या ते 12 विविध प्रकारचे झुंबर तयार करतात. गावागावात असे झुंबर तयार करण्यासाठी ते इतरांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या ह्या कार्याची प्रेरणा घेऊन सुमारे 20 व्यक्ती असे वारू कुंचलू तयार करत आहेत. या घरट्यासाठी त्यांनी शेतात एका एकरात खास धानाची शेती केली असून हे पिक ह्या पक्ष्यांच्या खाद्यासाठी राखीव ठेवले आहे. बर्ड फिडर करणाऱ्या या संस्थेमार्फत लोकांना मोबदला दिला जातो. ह्या झुंबरमुळे मंदिर व ईतर निवांत ठिकाणी पक्ष्यांची मोठी रेलचेल राहते. पक्षांमुळे शेतकऱ्यांचे पिकांचा फायदा होतो. कारण हे पक्षी पिकांवरील कीटकांचा नाश करतात. हे सर्व पक्षी मानवांचं जीवन समृध्द करतात.
ह्या झुंबरमुळे पक्ष्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते. गावकरी सुध्दा ह्या शिक्षकांचे आभार व्यक्त करतात. कारण धालीनायडू ह्या शिक्षकामुळे समाजात चिमण्यांचे महत्व तर पटलेच शिवाय त्यांच्या पिकात सुद्धा पूर्वीपेक्षा वाढ झाली आहे. आज परिसरातील गावोगावी हे वारूकुंचलु बघायला मिळतात. पोलूवर्ती धालीनायडू यांच्या दशकभरातील पर्यावरण विषयक कामाची दखल शासनाने घेतली आहे. त्यांच्या हरित विकास फाऊंडेशनचे ध्येय चिमण्यांचे संवर्धन हेच आहे.