वनस्पती जगत

दुर्मिळ वनस्पती – चित्रक (Plumbago zeylanica)

दुर्मिळ वनस्पती – चित्रक (Plumbago zeylanica)

चित्रक ही उष्णकटीबंधिय क्षेत्रात आढळणारी झुडपी वनस्पती आहे. चित्रकाचे तीन प्रकार असून यात पांढरे, लाल व निळ्या रंगात आढळतात. याची फांदी तजेलदार असून सरळ व गोलाकार पसरतात. याचे पाने 4 ते 7 सेमी लांब व 2 ते 4 सेमी रुंद राहतात. ही एक औषधी वनस्पती आहे. शेकडो वर्षांपासून ग्रामीण आणि आदिवासी लोक औषधी वनस्पती म्हणून वापर करतात. काही ठिकाणी चित्रकच्या कोवळ्या पानाची भाजी करतात . चित्रक वनस्पतीची उंची साधारण 6 फुटापर्यंत वाढू शकते. औषध म्हणून वापर, रासायनिक फवारणी व खाण्यात भाजी म्हणून वापर होत असल्याने ही वनस्पती दुर्मिळ होत आहे.

चित्रक वनस्पतीला प्रखर सूर्या प्रकाशापासून आंशिक सावलीची गरज असते. फुलांच्या नंतर, झाडे जोमदारपणे वाढण्यासाठी पुन्हा कापली पाहिजेत. फळे मऊ मणक्यांवर गोंद असलेल्या लहान कॉकलेबरसारखी असतात आणि ते कोणत्याही गोष्टीला चिकटून राहतात. यात किटक सुद्धा चिकटतात. मूळ आणि मुळांची साल आणि बिया औषधी दृष्ट्या उत्तेजक, कास्टिक, पचन, जंतुनाशक, परोपजीवी विरोधी म्हणून वापरतात. चित्रकचा प्रसार कटिंग्जद्वारे, जुन्या वनस्पतींचे विभाजन किंवा बियाण्याद्वारे केला जातो.

औषधी उपयोग : चित्रकचा उपयोग आतड्यांसंबंधी त्रास, आमांश, रक्ताचा दाह, जळजळ, मूळव्याध, ब्राँकायटिस, खाज सुटणे, यकृताचे आजार साठी केला जातो. या औषधी वनस्पतीची पाने स्वरयंत्राचा दाह, संधिवात, प्लीहाचे रोग, रिंग वर्म, खरुज यांच्यावर उपचार करण्यासाठी चांगले काम करतात आणि ते कामोत्तेजक म्हणून काम करतात. चित्रक पचन सुधारण्यास मदत करते आणि ते भूक उत्तेजित करते.दमावर चित्रक गुणकारी आहे.चित्रक हे वात आणि पित्तयुक्त ज्वरांत, गर्भाशयाच्या क्रियेसाठी वापरण्याचा प्रघात आहे. ज्वरात सुगंधी पदार्थाबरोबर चित्रकाच्या मुळाचे चूर्ण तांदळाच्या पेजेंत उकळून वस्त्रगाळ करून देतात. जखमवर सुध्दा चित्रक उपयोगी ठरतो. काही जण याच्या सालीचा वापर मद्यात सुध्दा करतात.

टीप – कुठल्याही वनस्पतीचा औषध म्हणून वापर हा डॉक्टरांच्या सल्यानुसार करावा.

laksh

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close