Warning: foreach() argument must be of type array|object, bool given in /home/u114081366/domains/nisargdarpan.com/public_html/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/disable-comments.php on line 117

Warning: foreach() argument must be of type array|object, bool given in /home/u114081366/domains/nisargdarpan.com/public_html/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/disable-comments.php on line 117
जोतिबाचा प्रिय – दवणा – nisargdarpan
वनस्पती जगत

जोतिबाचा प्रिय – दवणा

जोतिबाची प्रिय वनस्पती – दवणा

(Artemisia Pallens)

दमना या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन दवणा या वनस्पतीचे नाव पडले आहे. आळंदी, शिखर शिंगणापूर,तुळजापूर यासह विदर्भातील सावंगा विठोबा येथील अवधूत महाराज यांच्या यात्रेत सुद्धा हि वनस्पती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. महानुभाव पंथात सुद्धा पाचही स्थानावर चैत्र पौणिमाला या वनस्पतीचा विशेष मान आहे. गुढीपाडव्याला तोरण व गुढी मध्ये याचा वापर करतात. श्री गणेश,भगवान विष्णू आणि महादेवाला दवणा वाहला जातो.

भगवान जोतीबाला दवणा का वाहतात ?

चैत्र पौणिमेला दख्खनचे केदारेश्वर श्री जोतीबा यांची यात्रा असते.‘जोतिबाच्या नावाने चांगभलं’ हे वाक्य सर्वांच्या परिचयाचे आहे. शिवाच्या तेज्यापासून काळभैरव प्रगटले. काळभैरवाने सर्व देवांचे दमन केले म्हणून देवांनी काळभैरवाला शाप दिला, तू दमनक वनस्पती होऊन पृथ्वीवर राहशील. तीच हि वनस्पती. दवणा गुणाने शीतल, कडू, तुरट, सुगंधी, ग्रहपिडानाशक म्हणून ज्योतिबाला आवडणाऱ्या वस्तू पैकी सुगंधी, हर्बल आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असणारी वनस्पती म्हणजे दवणा . दवणा ला देवाचे प्रतिरूप मानल्या जाते. विठ्ठलाची तुळस, महादेवाचे बेल त्याचप्रमाणे जोतीबाला पूर्वीपासून दवणा वाहला जातो. जोतीबा देवस्थानात पूजेच्या ताटात गुलाल, खोबरं आणि दवणा असतो. वात, कफ, पित्त या त्रिदोषाची दमन करणारी हि वनस्पती जोतिबाची ची प्रिय वनस्पती आहे.

दवणा वनस्पती ४०–६० सेमी. उंच व सरळ वाढते. खोडावर लव असते. फुले (स्तबक फुलोरे) गोलसर, पिवळट हिरवे, लहान आणि गुच्छाने येतात. बी फार लहान, काळे व लांबट असते. दवण्याच्या खालच्या, मधल्या व वरच्या पानांच्या आकारात फरक असतो. दवणा सुगंधी, कडू आणि तिखट आहे. दवणा वनस्पतीत बाष्पनशील तेल मिळते. हे तेल दाट व सुगंधी असून ते उच्च प्रतीच्या अत्तरात मिसळतात. सौन्दर्य प्रसाधनात याचा वापर केला जातो. या तेलात दवॅनोन आणि लिनॅलूल हे मुख्य घटक असतात. त्यामुळे तो वाळवलेला दवणा अत्यंत सुगंधी असतो .वनस्पतीची पाने, देठ इ. पुष्पगुच्छ व हार तयार करण्यासाठी वापरतात. कोल्हापूर जिल्झातील ‘केखले’ गावं दवणा वनस्पतीच्या नावाने विशेष प्रसिद्धीला आले आहे. महाराष्ट्रात दवणाचे सर्वाधिक उत्पन्न या गावात घेतल्या जाते. 1ग्रॅम वजनात सोळा हजार बियांचा समावेश असतो. दवणातील नागदवणा हा प्रकार कोकण भागात अधिक आढळून येतो. दवणाचे पिक 110 ते 115 दिवसात येते. दवणा तेलाला बाजारात चांगली मागणी असल्याने 1 हजार ते 1200 रुपये किलो दराने हे तेल विकल्या जाते.

औषधीय गुणधर्म :- 

दवणा हि वनस्पती वात, कफ, पित्त अश्या त्रिदोषावर काम करणारी वनस्पती आहे. विदर्भातील ग्रामीण भागातील लोकं उन्हाळी लागल्यास याचा वापर करतात. यासह पोटातील फुगारा, मुका मार बसला असता दवण्याचा गरम पाण्यात लेप करून लावतात. दमा खोकला आजारावर हा गुणकारी आहे. नाकफुटी , ताप रक्तक्षय, निद्रानाश,डोकेदुखी,व कृमिनाशक म्हणून हे उत्तम काम करते.

उन्हावर रामबाण ईलाज :-

आयुर्वेदात हि वनस्पती उपयुक्त असते. गर्मीत हे शरीर थंड ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उन्ह लागू नये म्हणून जुने लोकं खिशात किंवा सोबत कांदा वागवायला सांगत होते. दवणा देखील उन्हापासून बचाव करण्यासाठी अंत्यंत गुणकारी म्हणून ओळखल्या जातो. दवणा शक्तिवर्धक वनस्पती असून जर एखाद्याला उन्ह लागल्यास याची पावडर करून रात्रभर पाण्यात भिजू घालायची. सकाळी त्यात खडीसाखर मिसळून पिल्यास हे उपयुक्त ठरते. यामुळे झोप चांगली लागते. याच्या चूर्णामुळे पोटदुखी दूर होते. तसेच हे स्त्रियांच्या आजारावर गुणकारी ठरते.

टीप : कोणत्याही वनस्पतीचे औषध म्हणून सेवन हे वैद्य ( डॉक्टर) च्या सल्ल्यानुसार करावे.

laksh

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close