प्लास्टिक पुनर्वापरात एआयचा वापर
पुण्यासारख्या शहरात एका दिवसात घरातून साधारण 1309 मेट्रीक टन कचरा निर्माण होतो ज्यामध्ये 99 मेट्रीक टन प्लास्टिकचा समावेश असतो. यामधील किमान 37 मेट्रीक टन प्लास्टिक पुनर्वापर योग्य असून याचा पुनर्वापर होण्यासाठी एआय तंत्रज्ञानचा वापर केला जाणार आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) हि प्लास्टिकचा पुनर्वापर करून त्यापासून दर्जेदार डीझेल निर्मिती व्हावी यासाठी संशोधन कार्य करत आहे.
पुण्यातील काही कंपन्या घरातील प्लास्टिक बॉटल, पिशव्या, विविध निरुपयोगी प्लास्टिक जमा करून त्यापासून इंधन निर्मिती करत आहे. साधारण 100 किलो प्लास्टिक पासून 50 लिटर इंधन तयार होते. तर 25 ते 30 किलो गॅस ची निर्मिती होते. हाच गॅस पुन्हा कारखान्यात हिटिंग साठी वापरला जातो. उर्वरित वेस्टेज डांबरी रस्ते बनविण्यासाठी उपयोगात आणल्या जाते. मात्र अश्या पद्धतीतून तयार झालेले इंधन दर्जेदार राहत नसल्याने एनसीएल द्वारा यावर संशोधन केल्या गेले.
पुणे शहरात निर्माण होणान्या फक्त ३५ टक्के प्लास्टिकच्या कचऱ्याचा पुनर्वापर केला जातो. ज्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या विघटनातून (पायरॉलिसीस) डिझेल निर्मितीच्या प्रकल्पाचा समावेश आहे. मात्र दर्जेदार डिझेल उत्पादनाअभावी बहुतेक प्रकल्प बंद पडले आहे.मोजकेच यशस्वीपणे कार्यान्वित आहे. पायरॉलिसीस प्रकल्पांच्या उत्पादनवाढीवर एनसीएल संशोधन सुरू आहे. या दरम्यान जे निरीक्षणे आहेत त्यामध्ये सर्वच प्रकारचे प्लास्टिक पायरॉलीसीससाठी वापरल्यामुळे डिझेलचा दर्जा घसरतो. पॉलिप्रोपिलिन आणि पॉलीइथिलीन या प्लास्टिक पासूनच डिझेलची निर्मिती गरजेची आहे. शिवाय कारखानामध्ये विलगीकरण दरम्यान तापमान बदल महत्वाचा असून वर्गीकरणासाठी सुलभ आणि फायदेशीर पद्धतीची गरज असून विलगीकरण केल्यानंतरच प्लास्टिकचा वापर करण्याचे निष्कर्ष काढले आहे. यात एनसीएलने महत्वपूर्ण बदलही सुचविले आहे. ज्यामध्ये कच्चा माल म्हणून फक्त पॉलिप्रोपिलिन आणि पॉलीइथिलीनचा वापर गरजेचा असून पायरॉलिसीसची प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. डिझेल ग्रेड इंधनाच्या निर्मितीसाठी उत्प्रेरकाची निर्मिती गरजेची असून प्लास्टिक विलगीकरण करण्यासाठी ए आय तंत्रज्ञानचा वापर सुचविला आहे. ए आय तंत्रज्ञान मुळे प्लास्टिक विलगीकरण प्रक्रिया सुलभ होणार असून मनुष्यबळ कमी होणार आहे. याकरिता डॉ. समीर चिखली यांच्या नेतृत्वांत डॉ. एच. व्ही. पोळ, डॉ. नंदिनी देवी, डॉ. परेश ढेपे, डॉ. सत्यम वासीरेड्डी, डॉ. एन. बारसू, डॉ. रमेश सामंता ही शास्त्रज्ञांची टीम यावर संशोधन करत आहे.