दिन विशेष,

विद्यार्थ्यांना अनुभवले हत्तींचे जीवन

जागतिक हत्तीदिन :-विद्यार्थांना व्हीआयपी सूटमध्ये मेजवानी

विद्यार्थ्यांना अनुभवले हत्तींचे जीवन

जागतिक हत्तीदिन :-विद्यार्थांना व्हीआयपी सूटमध्ये मेजवानी

मेळघाटमधील सिमाडोहच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना आजचा दिवस संस्मरणीय ठरला तो आगळ्यावेगळ्या वाढदिवसामुळे. श्रावण सोमवारमुळे सकाळ सत्रात शाळा भरली असताना अचानक वनविभागाची व्होलार गाडी प्रांगणात उभी राहली. अचानक सहल घडली ती हत्तींदिनामुळे. हत्तींच्या वाढदिवसाच्या मुख्य अतिथी म्हणून आदरातिथ्य तर झाले शिवाय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ज्या सूटमध्ये थांबल्या व ज्या मेजवर त्यांनी फराळ केला तिथे विद्यार्थ्यांना चक्क नाश्ताच्या रुपात व्हीआयपी मेजवानी चाखायला मिळाली.

सकाळी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळातील सुमारे 22 विद्यार्थी व शिक्षकांसह वनविभाग द्वारा सरप्राईज सहल मिळाली. विद्यार्थ्यांनी कोलखास परिसरात प्रवेश करताच बर्थ डे गर्ल असलेल्या जयश्री, चंपाकली, लक्ष्मी, सुंदरमाला ह्या हत्तीनी भेटल्या. मेळघाटात राहून सुद्धा ह्या विद्यार्थ्यानी पहिल्यांदा हत्ती बघितला. हत्तींचा वाढदिवस साजरा केला जातो याचे त्यांना आश्चर्य वाटले. तिथेच पर्यटनाला आलेल्या एका चिमुकलीच्या हस्ते केक कटिंग करण्यात आले. हत्ती दिनासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप तळखंडकर, वनपाल महल्ले ,वनरक्षक श्रीमती खव्वास, माहूत कामेश्वर दारशिम्बे व ईतर वन कर्मचार्यानी परिश्रम घेतले. या परिसरातील दुर्मिळ वनौषधी बाबत वनकर्मचारीकडून माहिती घेतल्यावर अप्पर रेस्ट हाउसला फेरफटका मारला. येथील सिपना, खंडू, खापरा, डोलार सूटमधील सागवान कारागिरी, विविध प्राण्यांचे मुखवटे, शिंगे व बांबू काम बघून विद्यार्थ्यांना सुखद अनुभव आला. आजच्या व्हीआयपी मेजवानीने दिवस संस्मरणीय ठरला असल्याचे वसुंधरा काळे या शिक्षिकेने म्हटले.

विद्यार्थ्यांची अनुभवले हत्तींचे शिक्षण :-

यावेळी पर्यावरण संतुलनात हत्तीची भूमिका किती मोलाची आहे हे माहिती पडले. माहुतांच्या आदेशानुसार हत्तीची वर्तवणूक बघून शिक्षणाने प्राण्यात सुद्धा बदल होत असल्याचा अथर्व कासदेकर या विद्यार्थ्याने म्हटले. स्वतः विद्यार्थ्यानी हत्तीला वाढदिवस निमित्य केळी खावू घालून शुभेच्छा दिल्या. हत्तींनी सुद्धा त्यांना वंदन करून प्रतिसाद दिला.

आगळावेगळा हत्ती दिन:-

हत्ती हा वन जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. सध्या हत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते म्हणून त्याचेकडे द्वेषाने पाहिले जाते. शिवाय हस्ती दंताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असल्याने त्याची तस्करी केल्या जाते प्रसंगी यासाठी त्याची शिकारसुध्दा मोठ्या प्रमाणावर केली जाते. या सर्व कारणाने परदेशात हत्ती रेड लिस्ट मध्ये आला आहे. भारतात असलेल्या हत्तीचे महत्व भावी पिढीला कळावे म्हणून वाढदिवस सारखा उपक्रम घेण्यात आल्याचे सिमाडोहचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप तळखंडकर यांनी सांगितले.

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close