बुद्धांच्या प्रेरणेतून जिल्हा परिषद शिक्षकांची अभ्यासिकेची निर्मिती
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निशुल्क सुविधा.
बुद्धांच्या प्रेरणेतून जिल्हा परिषद शिक्षकांची अभ्यासिकेची निर्मिती
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निशुल्क सुविधा.
भगवान गौतम बुद्ध यांनी शील, दान, उपेक्षा, नैष्काम्य, विंर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा व मैत्री असे जीवन जगण्याचे उत्तम दहा मार्ग सांगितले. पूर्वीच्या काळी बुद्ध विहार हे एक प्रकारची अभ्यासिका होती यातूनच पुढे नालंदा, तक्षशीला सारखी अभ्यास केंद्र विकसित झाली. यापासूनच अमरावती जिल्ह्यातील काही शिक्षकांनी प्रेरणा घेत लोणी टाकळी येथे विद्यार्थ्यांसाठी निशुल्क अभ्यासिकेची निर्मिती केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सुविधा व्हावी यासाठी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काही शिक्षकांनी एकत्र येत सुमारे वीस ते पंचवीस हजारांचे स्पर्धा परीक्षा पुस्तके, टेबल, खुर्ची, रॅक, परदे, पंखे आदीची भेट दिली आहे. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना चांगली सुविधा मिळावी म्हणून गावकऱ्यांनी पुढाकार घेत समाज मंदिर उपलब्ध करत पेव्हिंग ब्लॉक व ईतर भौतिक सुविधा उपलब्ध केली आहे. या अभ्यासिकामुळे विद्यार्थ्यांचा शहरी भागात जाण्याचा त्रास व वेळेची बचत होणार आहे.
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा लोणी येथील सहायक शिक्षिका अल्का वर्धे (वानखडे) यांनी मागील वर्षी स्थानिक बुद्ध विहारला 14 एप्रिल 2023 रोजी पाच हजारचे स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट दिली. या मधून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण झाली. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या बघता अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांना शहरासारखी अभासिका असावी असा विचार आला नि हा विचार सहकारी शिक्षकांच्या गटावर टाकला असता सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रा.अरुणा तसरे यांनी दिलेल्या मौलिक मार्गदर्शक तथा भक्कम सहकार्याशिवाय या कार्यात ज्योती राऊत, अनिल हिरेखन, विद्याशाली गुडधे, मनोज चौरपगार, जीवन गवई, सविता मेश्राम, सुरज मंडे, प्रशांत भगेकर, छाया राऊत, प्रणिता बोडखे, विद्या दिघोडे, विकास वानखडे, प्रमोद चोपडे, कृष्णकला चुनडे, रजिया सुलताना, तंतरपाळे आदी शिक्षकांनी आर्थिक सहकार्य दिले. या सहकार्यातून स्पर्धा परीक्षा पुस्तके, खुर्च्या, टेबल,पडदे, रॅक, पंखे ह्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. हि बाब जेंव्हा गावकर्यांना समजली तेंव्हा त्यांनी ह्या ज्ञान यज्ञात पुढाकार घेत अभ्यासिकेसाठी गावातील समाज मंदिर उपलब्ध करून दिले. याशिवाय समाज मंदिर अधिक अभ्यासपूर्ण व्हावे यासाठी रंगरंगोटी, चेकर्स ब्लॉग बसवून दिले. लवकरच इथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ :
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा दिल्लीचे एडीशनल कमिशनर (जीएसटी) डॉ.प्रशांत रोकडे यांचे हस्ते दिनांक 24 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. यावेळी लोणी ग्रामपंचायतचे सरपंच विनय बोबडे, उपसरपंच रोशनीताई खडसे, माजी उपसरपंच निलेश लोहकरे, नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रमिलाताई शेंडे , केंद्रप्रमुख प्रवीण मेहरे, निलेश वाघ ,बाळासाहेब भागवत, दीपक तीखिले, प्रवीण सवाई आदींच्या उपस्थितीत या अभ्यासिकेचे उद्घाटन होणार आहे.