शिक्षकदिनाला होणार आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा
जिल्हातील १६ शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर
शिक्षकदिनाला होणार आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा
दिनांक ५ सप्टेंबर रोजी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्य सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जातो. याच दिनाच्या निमित्याने जिल्हा परिषद अमरावती द्वारा मातोश्री विमलताई देशमुख सभागृह, शिवाजी नगर अमरावती येथे दुपारी ३ वाजता सन २०२३ -२४ चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण होणार आहे. जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेत हा सन्मानसोहळा होणार असून यावेळी जिल्ह्यातील १६ शिक्षकांना आदर्श पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अमरावती चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोषकुमार जोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रीती देशमुख , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विनी मारणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन व पंचायत) बाळासाहेब बायस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) श्रीराम कुळकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( महिला व बालकल्याण ) डॉ. कैलास घोडके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बुद्धभूषण सोनोने, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी (योजना) निखील मानकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अंतर्गत दिव्यांग कला क्रीडा संगीत व दिव्यांग विभाग मधून नीलिमा विनोद गरपाल (अमरावती), माध्यमिक शिक्षण विभागातून वीरेंद्र अज्ञानसिंग ब्राह्मण (अमरावती) आदींची निवड झाली असून माधुरी नारायण अमझरे (अमरावती), किरण मनोहरराव साकरकार (अचलपूर), आरिफफुर्रहमान मो. हनीफ (अंजनगाव सुर्जी), पंकज राजेंद्रराव दहीकर(भातकुली), मंजिता सुदामा खार्वे (चांदूर बाजार), राजेंद्र हरिदास वानखेडे (चांदूर रेल्वे), सुनील भूराजी जाणे (चिखलदरा), सुषमा डीसी मोहन (दर्यापूर), श्रीकृष्ण चंदू चव्हाण (धामणगाव रेल्वे), महादेव जयराम राठोड (धारणी), जयश्री रामदास शेकार (मोर्शी), जगदीश वासुदेवराव माहुलकर (नांदगाव खंडेश्वर), प्रमिला भास्करराव आखरे (तिवसा) प्रेमसुख शंकरराव ठोंबरे (वरुड) आदींची निवड झाली आहे.
शिक्षक दिनाला शिक्षकांचा सन्मान व्हावा म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढाकार घेतल्याने यावर्षी मुहूर्तावर हा सन्मान सोहळा होत आहे. दिनांक ५ सप्टेंबर रोजी आयोजित या शिक्षक सन्मान सोहळ्याला शिक्षक संघटनासह जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक शिक्षणाधिकारी (प्राथ) बुद्ध भूषण सोनोने, उपशिक्षणाधिकारी (प्राथ) दीपक कोकतारे, उपशिक्षणाधिकारी (माध्य) अनिल कोल्हे, कार्यक्रम समन्वयक तथा विस्तार अधिकारी मो. अशपाक अब्दुल रज्जाक यांनी केले आहे.