14 मार्च – जागतिक नदी बचाव दिन
14 मार्च – जागतिक नदी बचाव दिन
नदीतील पाणी हे केवळ मानवासाठी महत्वाचे नाही तर पशु,पक्षी व वनस्पती या सर्वांचे अस्तित्व या पाण्यावर अवलंबून आहे. जगभरात नदी संरक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी आणि बदलत्या हवामानाचं महत्व पटवून देण्यासाठी 14 मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात अनेक ठिकाणी नदी संरक्षक सदंर्भात कार्यक्रम आयोजित केले जातात. काही पर्यावरण आणि नदीप्रेमी एकत्र येऊन नदीला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पांना विरोध करतात. याआधी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय धरण विरोधी दिवस’ म्हणून साजरा केला जात होता. जगातील अनेक नद्यामध्ये जल प्रदूषणाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी नद्याचे जलस्त्रोत आटत चालले आहे. नद्यांचं, पाण्याचं आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचं संरक्षण व्हावं म्हणून हा दिवस करण्यात येतो. भारतातही काही संघटनांकडून यासंदर्भात ‘नर्मदा बचाव अभियान’ सारखे कार्यक्रम राबवले होते. “बदलत्या हवामानामुळे महापूर येतात आणि पाण्याचं प्रदूषण होतं त्यामुळे नद्यांचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. ज्या लोकांनी नदी संरक्षणासाठी आपला आयुष्य वेचलं आहे .त्यांचा सन्मान ह्या दिवशी केला जातो.
नदी बचाव दिनाचा इतिहास:
ब्राझीलमध्ये नदीवर धरण बांधण्याच्या प्रकल्पग्रस्त नागरिकांची बैठक मार्च महिन्यात 1997 ला घेण्यात आली होती. यानंतर जगातल्या 20 देशांनी 14 मार्च हा आंतरराष्ट्रीय नदी संरक्षण कृती दिवस म्हणून साजरा करण्याची परवानगी दिली होती. काही देशांमधील धरण प्रकल्पग्रस्त लोकांच्या संघटना नदी वाचवण्याच्या संदर्भात काम करत आहेत. भारतात 400 पेक्षा अधिक नद्या असून गंगा,जमुना,गोदावरी , कृष्णा, कावेरी सहित सर्वच नद्याची पूजा केली जाते. नद्यांचे नैसर्गिक, सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक तसेच धार्मिक महत्व आहे. अनेक नद्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम साजरे केल्या जात आहे. या नद्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2024 मध्ये सर्वांसाठी पाणी (water for all) हि या दिवसाची थीम ठेवलेली आहे