Warning: foreach() argument must be of type array|object, bool given in /home/u114081366/domains/nisargdarpan.com/public_html/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/disable-comments.php on line 117

Warning: foreach() argument must be of type array|object, bool given in /home/u114081366/domains/nisargdarpan.com/public_html/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/disable-comments.php on line 117
विमानाचे गावं – कॅमेरॉन – nisargdarpan
जिज्ञासा

विमानाचे गावं – कॅमेरॉन

कार्यालयात ये - जा करण्यासाठी विमानाचा वापर

 

विमानाचे गावं – कॅमेरॉन

कार्यालयात ये – जा करण्यासाठी विमानाचा वापर

प्रत्येक गावाची आपली आगळीवेगळी ओळख असते. कोणते गावं एखाद्या वनस्पती मुळे नावारूपास येते तर कोणते पक्षी किंवा प्राण्यांमुळे. उदा द्यायचे झाल्यास एखाद्या गावात मांजरी जास्त असल्या तर मांजरखेड, उंबराचे झाडं असली तर औदुंबरावती. अगदी असेच एक गावं विमानामुळे नावारूपास येत आहे. कारण या गावात प्रत्येकाच्या घरासमोर विमान उभी असल्याचे दिसून येतात. बाजारात किंवा कार्यालयात जाण्यासाठी येथील लोकं विमानाचा वापर करतात. या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे खाजगी जेट आहे.

अमेरिकेतील कॅलिफेर्नियाच्या एल डोराडो काउंटी येथील कॅमेरॉन एअर पार्क नावाचे गाव विमान वाहतुकीसाठी अतिशय खास गाव आहे. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे खाजगी जेट आहे. गावात सुमारे 124 घरे आहेत. प्रत्येक घरासमोर स्वतःचे खाजगी जेट पार्क केलेले असते. तुम्ही विचार करत असाल की, गावातील लोक इतके श्रीमंत आहेत की, ते कार किंवा बाईकऐवजी जेट वापरतात, तर तसे नाही. या गावाची स्थापना 1963 साली झाली. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेतील वैमानिकांची संख्या लक्षणीय वाढली होती. युद्धासाठी अनेक विमानतळ बांधले गेले. युद्ध संपल्यानंतर ते बंद झाले नाहीत. सरकारने ही एअरफील्ड्स निवासी एअर पार्क म्हणून सोडली. नंतर सरकारने या भागात निवृत्त वैमानिकांना राहण्याची व्यवस्था केली.

कॅलिफोर्नियातील कॅमेरॉन एअर पार्क हे असेच एक एअरफिल्ड आहे, जिथे प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे खाजगी जेट आहे. या गावातील बहुतांश लोक निवृत्त वैमानिक आहेत, त्यामुळे ते स्वतःची विमाने देखील उडवतात. हे एअरफील्ड असल्याने रस्तेही अशाच पद्धतीने बांधण्यात आले आहेत. रुंद रस्ते असल्याने हि विमाने सहज येथे आवागमन करता येतात. विशेष म्हणजे येथील रस्त्यांचे नावे सुद्धा विमानांच्या नावावरून ठेवण्यात आली आहे. उदा बोईंग रोड. लोकांच्या घरात गॅरेजऐवजी हँगर्स आहेत. येथील रुंद रस्ते धावपट्टीसारखे काम करतात. कॅमेरून एअरपार्कच्या रस्त्यांवर लावण्यात आलेले साइन बोर्ड आणि लेटरबॉक्सही खाली उतरवण्यात आले आहेत, जेणेकरून विमान उड्डाण करताना कोणतीही अडचण येऊ नये.

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close