तारुण्य जपणारी गुळवेल (Tinospora cordifolia.)
तारुण्य जपणारी गुळवेल (Tinospora cordifolia.)
गुळवेलला गुडुची, घामोळी, गलोय या विविध नावानेही ओळखल्या जाते. हि वनस्पती अनेक आजारात अमृतासमान गुणकारी असल्याने ‘अमृता’ ह्या नावाने ओळखल्या जाते. अनेक औषधी काढ्यामध्ये गुळवेलचा वापर केला जातो. कडुनिंबाच्या झाडावरची वेल सर्वात जास्त औषधीयुक्त आहे त्यामुळे तिला निमगिलोई असे म्हणतात.
गुळवेल ही वनस्पती हवेतील आद्रते वर ही जगते. ही अनेक वर्षे टिकणारी म्हणजे दीर्घायू असून एखाद्या झाडाच्या वा दुसऱ्याच्या आधाराने धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेलवर्गीय वनस्पती आहे. गुळवेलची पाने हृदयाच्या आकाराची असतात. यास पिवळी फुले येतात व लाल रंगाची छोटी छोटी गोल फळे झुबक्यां मध्ये लागतात. गुळवेलीच्या मोठ्या वेली मांसल असून, मोठ्या झाडांवर व कुंपणांवर पसरलेल्या असतात. नर व मादी फुले वेग वेगळ्या वेलींवर येतात. गुळवेलीला नोव्हेंबर ते जून या कालावधीत फुले, फळे येतात.
गुळवेल त्रिदोष शामक आहे. डेंग्यू, चिकन गुनिया, स्वाईन फ्लू, साधा ताप, डायबीटीस असो अन्य कुठलाही आजारात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुणकारी ठरते ती गुळवेल. संधीवात, विभिन्न चर्मरोग, मूळव्याध, महिलांचे प्रमेहादी विकार, मानसिक व्याधीं, रक्तातील कोलेस्टेरॉल व रक्तशर्कराचे प्रमाण कमी करते. गुळवेल कुटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियत कालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे. ती रक्त सुधारक असून, पित्तवृद्धीच्या काविळीत गुणकारी आहे. मधुमेह, वारंवार मूत्रवेग तसेच प्लिहा वृद्धीत उपयुक्त आहे. गुळवेल कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे. गुळवेलीने भूक लागते, अन्नपचन सुधारते, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते. कुपचन, पोटदुखी व काविळीत गुळवेल गुणकारी आहे. खाज व दाह कमी करते . गुळवेली च्या कोवळ्या पानां पासून भाजी करतात. या भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन होते, त्यामुळे शरीरा तील पचनाचे कार्य अधिक चांगले होते. गुळवेली मुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास अनेक आजारात हि औषधी म्हणून काम तर करते शिवाय शरीर निरोगी व सतेज ठेवण्यात उपयुक्त असल्याने तारुण्य जपणारी हि वनस्पती आहे.
Many times I watch this website and its contents , so good
Thank You Sir