
दृष्टिहिनांसाठी येतोय ‘तिसरा डोळा’
स्मार्ट चष्माद्वारा अंधाचं जगणं होणार सुलभ
देशात 6 कोटी लोकांची दृष्टी कमजोर असून यातील दीड कोटी लोक दृष्टिहीन (अंध) आहे. नेत्रहीन लोकांच्या आयुष्य सोपे व्हावे यासाठी दिल्ली येथील डॉ. राकेश जोशी (नेत्रतज्ञ) यांनी एक स्मार्ट चष्म्याची निर्मिती केली आहे. या चष्म्यात त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व मशीन लर्निग (ML). चा वापर केला असून हा चष्मा दृष्टिहिनांसाठी तिसरा डोळा म्हणून काम करणार आहे. विशेष म्हणजे मोबाईल एप्सच्या मदतीने या चष्मा काम करत असल्याने दृष्टीहिन व्यक्तींसाठी हा वरदान ठरणार आहे.
सामान्य चष्मा प्रमाणे याच्या एका दांडीला स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर केला असून यात 5 मोड दिले आहे.
1) फ्रंट मोड – यामध्ये दृष्टिहीन व्यक्ती घरात, घराबाहेर चालताना पुढे काय आहे याची माहिती शाब्दिक स्वरूपात सांगणार आहे. चालतांना एखादे पडदे, दरवाजे, झाड, कुंडी, व्यक्ती प्राणी आल्यास याची माहिती तुम्हाला मिळणार आहे.
2) रीडिंग मोड – या मोड मध्ये तुम्हाला वाचता येणार आहे. विशेष म्हणजे या डिव्हॉईसला 69 भाषा सपोर्ट करत असून इंग्रजी भाषेसह जगातील अन्य भाषांचा वापर यात केला आहे. यामुळे गुगल लेन्स प्रमाणे वाचन करता येणार आहे. इंग्रजी, हिंदी,मराठी,कन्नड,तेलगू,गुजराथी सह भारतातील महत्वाच्या भाषांचा यात समावेश आहे. टायपिंग सह हस्तलिखित लेखन सुध्दा याद्वारे वाचता येणार आहे.
3) वॉकिंग मोड – या मोड मध्ये तुमचे चालणे सुलभ होणार आहे. तुम्हाला समोर किती पावले टाकायचे आहे. डावीकडे किंवा उजवीकडे वळायचे आहे किंवा अडथळे काय आहे हे या द्वारा माहिती होणार आहे. ह्या चष्म्याला जी.पी.एस सपोर्ट दिला आहे.
4)फेस डिटेक्शन – या स्मार्ट चष्म्याची खासियत म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला मोबाईलवर कोणाचा कॉल आला तर टॉकिंग मोड द्वारा मोबाईल आपल्याला समोरच्या व्यक्तीचे नाव घेतो त्याचप्रमाणे यात काही व्यक्तीचे फोटो व नाव सेव्ह केल्यास फेस डिटेक्शन द्वारा माहिती देणार आहे.
5) हेल्प मोड – वरील पैकी तुमच्या समस्यांचे निराकरण न झाल्यास पाचवी बटन दाबल्यावर तुम्हाला आणखी तांत्रिक सहकार्य मिळणार आहे.
लिंगभेद ओळखणार : हा चष्मा दृष्टीहिन व्यक्तीला समोर चा व्यक्ती स्त्री आहे की पुरुष यातील भेदाभेद ओळखतो,शिवाय समोरील व्यक्तीचे वय, ती व्यक्ती हसत आहे की रडत आहे किंवा त्यांचे हावभाव सुध्दा सांगू शकतो. एखाद्या विज्ञान प्रदर्शन मध्ये ज्याप्रमाणे वाहन चालकांना डुलकी आल्यास चालकांना सूचना देण्याचे काम मशीन लर्निग करतो अगदी त्याचप्रमाणे हा चष्मा काम करत आहे.
अशी झाली सुरुवात :- कोरोना काळात दिल्लीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एक महिला रुग्ण नेत्रतज्ञ डॉ. राकेश जोशी यांचेकडे गेल्या तेंव्हा त्यांची दृष्टी कमजोर झाली. डॉ.जोशी यांनी त्यांचे एका इंजिनिअर मित्रासह या चष्म्यावर संशोधनाचे कार्य केले व नंतर या चष्म्याची निर्मिती केली. बंगलोर स्थित एका स्टार्टअप इंजिनिअरिंगचे यासाठी सहकार्य लाभले आहे. यापूर्वी असा चष्मा इस्राईल या देशात बनविला असून तिथल्या पेक्षा अत्यंत कमी दरात हा चष्मा भारतात तयार होत आहे. भविष्यात याची मागणी वाढल्यास अत्यल्प दरात दृष्टिहीन व्यक्तींना हा चष्मा प्राप्त होऊ शकतो.
संदर्भ -NNI