व्यक्ति विशेष

त्या प्राध्यापिकेची 5 R ची अनोखी जीवनशैली

सीमा श्रीवास्तव यांची झिरो कार्बन फुटप्रिंटसाठी धडपड

त्या प्राध्यापिकेची 5 R ची अनोखी जीवनशैली

‘अतिथी देवो भव’ या म्हणीप्रमाणे आपण ह्या पृथ्वीवर केवळ काही काळाचे पाहुणे आहोत. ज्या प्रमाणे सृष्टीतील ईतर जीव ह्या वसुंधरेवरून माघारी जातांना आपला कोणताही पुरावा ठेवत नाही, मग मनुष्य प्राणी ह्या पृथ्वीवर एवढा कचरा का करतो ? आपण कधी कपड्याचे तुकड्यांच्या स्वरुपात, इलेक्ट्रॉनिक साहित्य,प्लास्टिक, रासायनिक औषधे, भंगार आदी विविध स्वरुपात हा कचरा निर्माण करतो. हा कचरा डम्पिंग यार्ड स्वरुपात जमा होतो. याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन, कार्बन डायऑक्साईड , नायट्रोजन, सल्फरडायऑक्साईड सारख्या गॅसेस रुपाने वातावरणात प्रदूषण निर्माण करतो.

मुळच्या लोणार येथील सीमा श्रीवास्तव (जोगड) ह्या नोएडास्थित एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात. कॉम्पुटर इंजिनिअरिंगसह त्यांनी पी.एच.डी .व पोस्ट पी.एच.डी केली आहे. सध्या त्या पर्यावरण विषयात एम.इ करत आहे. मात्र गत सहा वर्षापासून त्या पर्यावरणातील जनजागृतीसाठी समाजात भरीव कार्य करीत आहे. आपण पृथ्वीवरून निरोप घेतांना आपली कुठलीही कार्बन फुट प्रिंट इथे राहू नये म्हणून त्यांनी आपली संपूर्ण जीवनशैली बदललेली आहे. प्लास्टिक बॅगमुळे दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक जलचर प्राणी आपला जीव गमावतात. दरवर्षी 300 मिलियन टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. एका स्वयंपाक घरातून साधारण दरवर्षी 300 ते 350 किलो कचरा निघतो. त्यामुळे घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करतात. कचऱ्यापासून खत निर्मिती करत ते घरच्या रोपट्यांना टाकतात. चॉकलेट्स व ईतर रॅपर्स प्लास्टिक बॉटल मध्ये जमा करत त्यापासून एको ब्रिक्स तयार करतात. एका गायीच्या पोटातून 10 ते 50 किलो प्लास्टिक कचरा सापडून येतो त्यामुळे घराबाहेर पडतांना सोबत कापडी पिशवी वापरतात. बाहेर प्रवासाला जातांना सुद्धा त्या स्टील भांड्याचा वापर करतात व मुक्काम दरम्यान हॉटेल चालकांना तसा आग्रह धरतात. विविध दैनंदिन जीवनात बांबूपासून तयार केलेले ब्रश, ईयर बड्स, टंग क्लिनर वापरतात. घरातील तुटलेल्या टाइल्स फेकून न देता त्यापासून सुंदर वॉल पेंटिंग बनवतात. ई वेस्ट साठी असल्यास रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीकडे वस्तू सुपूर्द करतात. घरातील निरुपयोगी कपड्याच्या सुंदर बँग तयार करून त्यावर पेंटिंग करतात. काही हिरवा भाजीपाला घरच्या घरी निर्माण करतात. बाहेर प्रवासात स्टील साहित्याचा उपयोग करतात. अगदी चहाच्या फोल्डिंग ग्लास त्या बॅग मध्ये वापरतात. मासिक पाळी दरम्यान त्या सॅनिटरी पॅड ऐवजी मेन्यूस्ट्रीयल कपचा अवलंब करतात. आतापर्यंत त्यांनी अनेकींना हे कप गिफ्ट म्हणून भेट दिले आहे. त्यांची हि निसर्ग धडपड बघत अनेक मैत्रिणीनी यावर्षी तीळ संक्रातचे वाण म्हणून हे कप भेट दिले आहे. हा एक साधारण 10 वर्ष उपयोगी ठरणार असून भविष्यातील कितीतरी प्रदूषण वाचवू शकतो असे त्यांचे मत आहे. साधारणतः प्लास्टिकचे विघटन व्हायला वीस वर्ष पासून ते एक हजार वर्षपेक्षा अधिक कालावधी लागतो. निसर्ग विषयक जनजागृतीसाठी साठी त्या ‘निसर्ग मैत्री’ या नावाने यु ट्यूब चॅनेलद्वारा पर्यावरण पूरक जीवनशैली व प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाय योजना कृतीयुक्त पद्धतीने सादरीकरण करतात.थोडक्यात सांगायचे झाल्यास Refuse, Reduce, Recycle, Reuse, Recover या 5 R प्रमाणे त्याआपली जीवनशैली जगतात.

विद्यार्थी घेतले दत्तक :-

सीमा श्रीवास्तव ह्या स्वतः एक अधिव्याखाता असतांना त्या रस्त्यांवरील गरजू मुलांना दत्तक घेत त्यांना शिक्षण देतात. कधीकधी स्वतः ह्या मुलांना त्यांच्या निवास ठिकाणी जावून अध्यापन करतात. गरजू मुलांना सायकल वाटप. विदर्भातील काही जिल्हा परिषद शाळांना र्त्यांनी स्वेटर, सॉक्स व शूजचे वाटप केले आहे. प्राणिमात्रांवर त्यांचा विशेष जीव असून महाशिवरात्रीला त्यांनी साडे सातशे गायींना गुळाचे वाटप केले. रस्त्यांवरील छोट्या दोन कुत्र्यांच्या पिल्लांना त्यांनी दत्तक घेत त्यांचे लसीकरण व सेवा सुश्रुषा करत जीवनमान उंचावले आहे. जॉय ऑफ गिविंग अंतर्गत कॅन्सरग्रस्त महिलासाठी विग तयार करण्यासाठी केश दान करण्याची मोहीम राबविली. त्यांच्या या मोहिमेमुळे निराशेच्या गर्तेत पोहचलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे स्मितहास्य आणण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.

laksh

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close