राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा
राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय बक्षिसांची सुवर्ण संधी

राज्यस्तरीय घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे आयोजन
राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय बक्षिसांची सुवर्ण संधी
अमरावती :-
आम्ही सारे शिवप्रेमी, क्षात्रवीर, संभाजी क्रीडा व युवक प्रतिष्ठान आयोजित व जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व युवराज संभाजीराजे मित्रमंडळ संयोजित राज्यस्तरीय संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड मध्ये या स्पर्धेची नोंद असून गेल्या 10 वर्षांपासून हि स्पर्धा सुरु आहे दि. 19, 20 व 21 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय प्रथम बक्षीस जिजाऊ बँक व आयोजन समिती यांचे संयुक्त विद्यमाने 21000 रुपये एवढे आहे. द्वितीय बक्षीस 11000 रुपयांचे असून कै. बापूसाहेब देशमुख तळवेलकर यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ श्री बच्चूसाहेब देशमुख यांच्या कडून देण्यात येणार आहे.
तृतीय बक्षीस 5000 रुपयांचे असून प्रा. आशिष देशमुख, दर्यापूर यांचे कडून देण्यात येणार आहे. चतुर्थ बक्षीस 2500 रुपये असून युवा इनोव्हेटर कु. साक्षी धनसांडे वणी यांच्या सहकार्याने देण्यात येणार आहे. दशकपूर्ती वर्षानिमित्ताने 11000 रुपयांची विशेष प्रोत्साहनपर बक्षिसे कै. इंजि. सचिनदादा चौधरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणार आहे.
या स्पर्धेची संकल्पना तथा मुख्य संयोजक डॉ. तुषार देशमुख ( 9730015899) आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान स्पर्धेचे मुख्य संयोजक डॉ. तुषार देशमुख यांनी केले आहे.
या स्पर्धेत मराठा सेवा संघ अमरावती जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद, महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच व सर्व शिवप्रेमी संघटनांचा सहभाग आहे.
आग्रा भेट, छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत मावळे, प्रतापगड रणसंग्राम या विविध विषयावरील स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी सर्व मावळ्यांनी आपल्या घरी शिवरायांच्या मूर्ती किंवा फोटोचे पूजन करून आकर्षक व नाविण्यपूर्ण सजावट दि. 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान करावी. सजावटीचे कोणतेही तीन फोटो आपल्या कुटूंब, शेजारी व मित्रमंडळीसह काढुन खाली दिलेल्या कोणत्याही एका संयोजकाच्या व्हाट्सअप नंबरवर पाठवावा. यात आपला संपूर्ण पत्ता ( मोबाईल नंबर सह ) टाकावा. उत्कृष्ट अशा सजावटीचे परीक्षण करण्यासाठी 3 दिवसात आपल्या घरी येतील. या स्पर्धा करिता ‘अ’ गट वय वर्ष 5 ते 16 व ‘ब ‘ गट वय वर्ष 17 ते 30 अशा दोन गटात मावळ्यांना सहभागी होता येईल. राज्यस्तरावर उत्कृष्ट आठ स्पर्धकांना दोन गटात ( ‘ अ ‘ व ‘ ब ‘ ) असे विभागून सर्व बक्षिसे देण्यात येईल.
गुणांकन हे विषयाची मांडणी, कौटुंबिक सहभागी, वेशभूषा सामाजिक संदेश, प्रचार प्रसार व मागील वर्षाचा सहभाग या मुद्यावर आधारित असेल. असे संयोजन समितीच्या सीमाताई बोके, प्रा मनाली तायडे, हर्षा ढोक, डॉ अंजली जवंजाळ, शरद काळे, निखिल काटोलकर, रिद्धेश ठाकरे अजय इंगळे, ज्ञानेश तुरखडे, अक्षय पांडे, मृत्युंजय आवारे, श्रेयश बर्वे यांनी केले आहे.