रक्षाबंधनच्या पर्वावर चंदामामाची अनोखी भेट

रक्षाबंधनच्या पर्वावर चंदामामाची अनोखी भेट
रक्षाबंधनच्या पर्वावर सध्या राज्यात अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रोख रक्कम भेट म्हणून मिळत आहे. याच पर्वावर बहिणींची खुशी आणखी द्विगुणित होणार आहे कारण याच दिवशी चांदोबा नेहमीपेक्षा मोठा दिसणार आहे. एवढा मोठा की त्याचा आकार नेहमीपेक्षा 14 पट मोठा आणि 30 टक्के अधिक प्रखर दिसणार आहे. या घटनेला खगोलीय भाषेत सुपर मून असे संबोधिल्या जाते. या दिवशी चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर कमी होणार असल्याने चंद्र अधिक मोठा व अधिक प्रखर दिसणार आहे.
चंद्राच्या परिक्रमाचे एक चक्र पूर्ण होण्यासाठी 29.5 दिवस लागतात. म्हणजेच 12 चक्र पूर्ण करण्यासाठी 354 दिवस लागतात. या कारणास्तव, कॅलेंडर वर्षात 13 वी पौर्णिमा दर 2.5 वर्षांनी किंवा त्याहून अधिक वर्षांनी साजरी केली जाते. या 13व्या पौर्णिमेला ब्लू मून म्हणतात. हा ब्लू मून आपल्याला 19 ऑगस्ट 2024 रोजी दिसणार आहे. ब्लू मून अंदाजे दर 2 ते 3 वर्षांनी येतो. आता पुढील हंगामी ब्लू मून 31 मे 2026 रोजी होईल
सुपर ब्लू मून केंव्हा दिसेल ?
संपूर्ण जगभरात ब्लू मून दिसणार आहे. परंतु प्रत्येक देशातील त्याच्या पाहण्याची वेळ भिन्न असणार आहे. 18, 19 आणि 20 ऑगस्ट रोजी सुपर ब्लू मून दिसणार आहे. तर भारतात १९ ऑगस्टच्या रात्रीपासून २० ऑगस्टला सूर्योदय होण्यापर्यंत आपण ते पाहू शकणार आहोत. सुपर ब्लू मून पाहण्यासाठी ज्या ठिकाणी आकाश निरभ्र असेल आणि वायू प्रदूषण कमी असेल ते ठिकाण योग्य असेल. सुपर ब्लू मून पाहण्यासाठी शहरातील दिव्यांपासून दूर जाणे चांगले.
वर्षात अश्या काही पौर्णिमा असतात जेव्हा सुपर मून दिसतो. वास्तविक, चंद्र जसजसा पृथ्वीभोवती फिरतो, तसा तो पृथ्वीपासून जवळ आणि दूर जात राहतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो तेव्हा सुपरमून होतो. चंद्र पृथ्वीच्या ९० टक्क्यांहून अधिक जवळ असतानाही हे घडते. 19 ऑगस्ट 2024 रोजी श्रावण पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असेल.