
एकाच घरी गाव-शहरातील 451 गणेशमूर्ती
खंडेलवाल परिवाराची 33 वर्षाची परंपरा
अमरावती शहरातील श्रीकृष्ण पेठ स्थित राजेश खंडेलवाल यांच्या घरी एक दोन नव्हे तर तब्बल 451 गणेशमूर्ती विराजमान झाले आहे. 1991 साली सुनिता खंडेलवाल यांनी केवळ 11 गणेश मूर्ती पासून हि सुरुवात केली. आज त्यांचे घरी तब्बल 451 गणेशमूर्तीचे संकलन झाले असून त्यांनी या सर्व गणेश मूर्तीचा सुंदर देखावा निर्माण करत निसर्गातील विविध रुप दाखवत शहरातील व गावातील गणेशोत्सवाचे दर्शन घडविले आहे.
ऑलिम्पिकपटूना मानवंदना :-
घराच्या प्रवेशद्वारावर ऑलिम्पिकची रिंग उभारून विविध मैदानाच्या माध्यमातून ऑलिम्पिकपटूना मानवंदना दिली आहे. या खेळातील विविध खेळाडू चे कटिंग्ज बनवून प्रत्येक खेळाचे मैदान चित्र काढले आहे. समोर ऑलिम्पिकपटूचे मोठे चित्र लावले आहे.

गाव -शहरातील गणेशोत्सव :-
गाव व शहरातील गणेशोत्सव कसा साजरा केला जातो याचा देखावा घरातील पहिल्या भागात दाखविला आहे. गाव जरी लहान व गरीब असले तरी तेथील मंदिर हे मोठे व गणेशोत्सव पूर्णतः निसर्गपूरक असतो, तेच मेट्रोमध्ये श्रीमंती वास करत असली तरी येथील गणेश मंदिर छोटे बघायला मिळतात. शहरात उंच इमारती, कारखान्याचा धूर, उद्यागधंदे प्रदूषण तर असतात सोबत गणेशोत्सवमध्ये प्लास्टिक वापर, ध्वनिप्रदूषणसारखे निसर्गाला हानिकारक बाबी बघायला मिळतात.

वृंदावनातील कृष्ण व पंढरपुरातील विठ्ठल :-
पुढे एका कोपऱ्यात वृंदावनातील कृष्णलीला बघायला मिळतात. वृंदावनातील बारीकसारीक बाबींचे रेखाटन इथे केले आहे. गोपिका पासून माखनचोर कृष्ण इथे बघायला मिळतो. त्यानंतर पंढरपुरातील विठ्ठलरुपी गणेश बघायला मिळतो. विठ्ठला समोर वारकरी संप्रदाय विठूनामात दंग दिसून येतो.
बाजूला बालगणेशचे विविध रूप बघायला मिळतात. खेलभांडे, वाहन, चेंडूसह बाललीला दिसून येतात. पहिल्या मजल्यावर शंकर भगवान सह ओसाड व हिरवळ निसर्गातील देखावा बघायला मिळतो. हिरवळीत विविध प्राणी पक्षी यांचे आनंदी रूप तर बाजूला ओसाड झाडावर निसर्गातील जीवांची होत असलेली दैना बघायला मिळते.
स्त्री अत्याचाराचा मुद्दा प्रवेशद्वारावर :-
सध्या देशभर गाजत असलेल्या बदलापूर घटनेचे प्रतिबिंब या गणेशोत्सव द्वारा मांडण्याचा प्रयत्न सागर खंडेलवाल ह्याने केला आहे. घरच्या पहिल्या मजल्यावर चढताना
महाभारत मे कृष्ण,
रामायण मे राम,
भगवान ने भी उठाया हथियार,
क्यो चूप है हम इन्सान ?
असा प्रश्न करत खाली राज्यातील बदलापूर घटनावर भाष्य केले आहे.
बेटी पढी बेटी बची नही,
कहा है सरकार? कहा है इन्साफ,
क्या करेंगे हम भगवान के,
धरती पर आने का इंतजार.
असा खडा सवाल त्यांनी देखाव्यातून मांडला आहे.
बेस्ट फ्रॉम वेस्ट :-
राजेश खंडेलवाल यांचे चिरंजीव सागर ह्याच्या लग्नातील काही पत्रिका घरी शिल्लक असताना त्यातील काही चित्रांचे कट आउट तयार करत घरातील प्रत्येक पायरीवर मापलांच्या मदतीने ते उभारले आहे. घरातील वेस्ट पासून बेस्ट बनवत घरात गणेशोत्सव चा सुंदर देखावा निर्माण केला आहे.