भटकंती

विदर्भात सापडले 1800 वर्षापूर्वीचे शहर

विदर्भात सापडले 1800 वर्षापूर्वीचे शहर

यवतमाळ जिल्ह्यातील वणी शिरपूर रोडवर असलेल्या मंदर गावात सुमारे १८०० पूर्वीचे गावाचे अवशेष सापडले आहे. येथे सापडलेली प्राचीन मूर्ती, नाणी आणि वस्तूवरून पश्चिम क्षत्रप भर्त्रदामन राज्यातील धंदर नावाचे मोठे शहर असल्याचे समोर आले आहे. वणीजवळील कायर येथे केलेल्या उत्खननात सातवाहन काळातील पुरावे सापडली आहेत, त्यामुळे इथेसुद्धा सातवाहन राज्याचे राज्य असल्याचे पुरातत्त्व संशोधक व इतिहास अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांचे म्हणणे आहे.

प्रा. सुरेश चोपणे हे मागील अनेक दिवसांपासून या भागाचा अभ्यास करीत आहे. मंदर येथील शेतकऱ्याजवळ संग्रहीत तांब्याची नाणी तिसऱ्या शतकातील पश्चिम क्षत्रप राजाची असून त्यांना ‘ड्रेक्मा’ असे म्हटले जाते. येथे आढळलेल्या पुराव्यावरून धंदर हे जवळजवळ दोन किमी परिसरात वसलेले गाव होते. श्रीमंत लोकांची विटांची घरे तर सभोवताल मातीची लहान घरे होती. गावाला पाणीपुरवठा व्हावा म्हणून पूर्वेला आणि उत्तरेला दोन मोठे तलाव बांधले होते, ते आजही सुस्थितीत आहेत. तलावाच्या बाजूला असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी दगडाचे चौरस उघडे पंचायत सभागृह, मृतांना दफन केलेले स्थळ दिसतात. सर्वत्र मोठ-मोठे फुटलेले रांजन, मटके, दिवे, विटा, काळ्या खडकाची पाटे-वरवंटे विखुरली दिसतात. अनेक काळ्या दगडांची गृहोपयोगी वस्तू, स्त्रियांच्या मूर्त्या, गाय, बैलांची हाडेसुद्धा आढळली आहेत.

 

शासनाच्या पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी उत्खनन केल्यास अनेक वस्तू, नाणी, अलंकार आणि पुरावे आढळू शकतात, या परिसरात शेती असून या रीठामधील भाग १० फूट उंच आहे. त्या ठिकाणी पडलेली घरे दबलेली आहेत. आज येथून गेलेला राज्यमार्ग हा प्राचीन गावातून गेलेला आहे, त्यामुळे अनेक पुरावे सुद्धा नष्ट झाल्लेली आहेत. हे गाव प्राचीन असले तरी येथे मध्ययुगीन काळातील पुरावे सापडण्याचे दाट शक्यता आहे. शासनाच्या पुरातत्व विभागाने किंवा नागपूर विद्यापीठाने इथे उत्खनन करून संशोधन करण्याची मागणी या निमित्याने पुढे येत आहे. प्राचीन काळातील अवशेष सापडल्याने अनेकांना कुतूहल निर्माण होत आहे.

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close