हाडे जोडणारी – मांसरोहिणी ( Soymida febrifuga)
एखाद्या व्यक्तीला धारदार वस्तूचा चिरा बसला तर रक्त वाहते पण असाच चिरा झाडाला बसला तर रक्तावलेलं झाड तुम्ही बघितलं का ? पण रोहण या झाडाला कुऱ्हाडीचा घाव घातला तर यातून रक्तासारखा लाल द्रव्य बाहेर पडतो म्हणून याला रक्त रोहिणी या नावाने ओळखले जाते. यालाच रोहन, रोहिणी, मासरोहिणी या नावाने ओळखल्या जाते. इंग्रजी मध्ये इंडियन रेड वूड ट्री असे नाव असून मिलीएसी म्हणजे कडूनिंब या वनस्पतीच्या परिवारातील आहे.
जुन्या काळात डॉक्टरांची संख्या कमी होती त्यात जनावरांच्या आजारावर ईलाज करणारे तज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते अश्या वेळी जुन्या जाणत्या अनुभवी लोकांकडून जनावरांच्या रोगावर इलाज केला जायचा. जनावरांना जखमा झाल्या, हाडांना इजा झाल्या तर या रोहन वनस्पतींची साल काढून पाण्यात उकळून प्यायला दिल्या जायची किंवा सालीचा मलम करून जखमेवर लावल्या जायचा. जनावरांची कशीही जखम असल्यास ती या मलमद्वारा भरून निघायची. या वनस्पतीमुळे कोणतीही जखम झाल्यास मांस जुड्ल्या जात असल्यामुळे मांस रोहिणी या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. काही ठिकाणी या वनस्पतीचा सालीचा रंगाचा उपयोग कपड्यांना रंग देण्यासाठी करतात. ह्या वनस्पतीच्या लाकडापासून फर्निचर तसेच दोर बनविल्या जातात. या वनस्पतीची फळाची वाळल्यानंतर त्याच्या पाकळ्या ह्या कमळ फुलासारख्या दिसतात.
रंग म्हणून उपयोग :-
या झाडाच्या बियांचा उपयोग कुंकू बनविण्यासाठी सुद्धा केला जातो. तसेच मिठाईला रंग देण्यासाठी हे उपयुक्त आहे.या झाडाचे साल व पाने हत्तीला अधिक पसंद असल्याने उत्तराखंडमध्ये ही वनस्पती संरक्षित केली होती.सालीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. जनावरांच्या विविध आजारांवर हि वनस्पती उपयुक्त असल्याने या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आल्याने सध्या अनेक ठिकाणी हि दुर्मिळ झालेली आहे.
औषधीय उपयोग :
हि वनस्पती त्रिदोष शामक आहे. हि वनस्पती वात, तोंडातील फोड, संधीवात, सांधेदुखी, खोकला, श्वास लागणे, कृमी, रक्तसंचय, जळजळ, पोट फुगणे, योनीविकार, पित्त, ज्वरनाशक, दाहक, भूक वाढवणारी आणि तोंडाचे व्रण, पोटदुखीच्या, जुलाब, आदी विविध आजारांवर गुणकारी आहे. टोंगळे घासले असेल , त्वचाविकार असेल तर रोहिणीची साल बारीक करून त्वचेवर लावल्याने त्वचाविकार दूर होतात. तसेच हि वनस्पती रक्त शुद्ध करणारी आहे.
फोटो सौजन्य :- श्री अनिल चौधरी अमरावती
खूपच उपयुक्त माहिती. आपल्या व्हॉट्सऍप ग्रुपला जॉईन झालो आहे. अशीच निसर्ग विषयक माहिती वाचायला आवडेल.
Thank You