शैक्षणिक

अमरावती विभागीय शाळा पूर्व अभियान मेळावा उत्साहात  

शिक्षकांमुळे विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल – मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी  

शिक्षकांमुळे विद्यार्थ्याचे भविष्य उज्वल – मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी

नांदगाव पेठ येथे अमरावती विभागीय शाळा पूर्व अभियान मेळावा उत्साहात 

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती व शिक्षणाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० एप्रिल रोजी जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव पेठ येथील प्रांगणात अमरावती विभागीय शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. शिवलिंग पटवे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी (भा.प्र.से.) यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोषकुमार जोशी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावतीचे प्राचार्य मिलिंद कुबडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोलाच्या प्राचार्य रत्नमाला खडके, यवतमाळ डायटचे प्राचार्य डॉ.प्रशांत गावंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(महिला व बालकल्याण) डॉ. कैलास घोडके, जिल्हा परिषद अमरावतीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने, अकोलाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंह पवार, शिक्षणाधिकारी (योजना) निखिल मानकर, जेष्ठ अधिव्याखाता प्रेमला खरटमोल, उपशिक्षणाधिकारी गजला खान, अमरावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, नांदगाव खंडेश्वरच्या प्रमिला शेंडे, आय. ए.एस अकादमीचे संचालक नरेशचंद्र काठोळे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री दुर्गे, मंगेश गवई वाशीम आदींची उपस्थिती होती.

विशेष अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी मुलांचा विकास हा चांगल्या संस्कारामुळे होतो आणि जिल्हा परिषद शाळा ह्या विद्यार्थ्यावर चांगले संस्कार करण्याचे केंद्र आहे. शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होते. धकाधकीच्या जीवनात शिक्षकांनी स्वतः फिट राहून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. अध्यक्षीय भाषणात शिक्षण उपसंचालक डॉ.शिवलिंग पटवे यांनी विद्यार्थी विकासासाठी या शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केले जाते. सर्वांच्या सहकार्य व समन्वयाने कोणतेही कार्य यशस्वी होते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात अमरावती विभाग राज्यातून प्रथम आला हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे श्री पटवे यांनी म्हटले.

या विभागीय शाळा पूर्व तयारी मेळाव्यात नांदगाव पेठ केंद्रातील उपस्थित प्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच कुंकवाचे ताटामध्ये पहिल्या पाऊलाचे ठसे घेण्यात आले. या मेळाव्यात मराठी व उर्दू माध्यमांचे शाळा पूर्व तयारी अंतर्गत २१ स्टॉलची उभारणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची नोंदणी करून शारीरिक विकास, बौध्दीक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास व गणनपूर्व तयारी असे विविध कौशल्य तपासण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी हत्तीच्या चित्राच्या सहाय्याने सेल्फी पॉइंट उभारण्यात आले.यावेळी परिसरातील प्रवेश पात्र विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका व शिक्षण क्षेत्रातील ईतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिव्याख्याता दीपक चांदुरे, संचालन विषय साधनव्यक्ती वैशाली वऱ्हाडे तर आभार अमरावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ अधिव्याखाता पवन मानकर, विजय शिंदे, अधिव्याखाता डॉ.राम सोनारे, डॉ.विकास गावंडे, केंद्रप्रमुख इक्बाल पटेल, दिलीप आठवले, विषय साधनव्यक्ती ममता गुर्जर, नलिनी गोरे, कविता उघडे, छाया मिरासे, अलका लुंगे, अश्विनी पोकळे, उमेश उदापुरे, श्री नाईटेकर, सुवार्ता इंगळे, रावूत, डॉ.प्रवीण राऊत, गोपाल ढवळी,सुवार्ता इंगळे, श्री नांदूरकर, प्रथम संस्थेचे विभागीय प्रमुख सुनील इंगळे, वैभव निर्मळ, मंगेश ढगे, शुभम देशमुख, सपना चोरे. आदींनी परिश्रम घेतले.

विद्यार्थी विकासाचे केंद्र :- बी.वैष्णवी

शाळा हे विद्यार्थी विकासाचे केंद्र आहे. निपुण भारत अंतर्गत शाळा प्रवेशासाठी शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केल्या जाते. असे मेळावे म्हणजे चिमुकल्या बालगोपालांचा उत्साहाचे उपक्रम असल्याचे प्रतिपादन उद्घाटक तथा अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी (भा.प्र.से.) यांनी केले.

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close