जपानी मेगुमीची अनोखी केशकर्तनकला
जपानी मेगुमीची अनोखी उंट केशकर्तनकला
राजस्थानच्या मारवाड भागात चर्चा आहे ती जपानच्या मेगुमी या महिलेची. अकरा वर्षापूर्वी त्या राजस्थानमधील बिकानेर येथे उंट प्रदर्शन बघायला आल्या नी त्या येथील उंटाच्या प्रेमात पडत्या. बिकानेर येथील प्रदर्शन दरम्यान उंटाचे केस कसे कापायचे याचे प्रशिक्षण त्यांनीं घेतले. त्या कलेपासून प्रेरीत होऊन त्यांनी केशकर्तनाचे विविध प्रयोग करत यात प्राविव्य प्राप्त केले आहे. कर्तन कलेतील विविधांगी प्रयोगामुळे जपानमधील शाळा, महाविद्यालयात ही कला शिकवायला त्यांना आंमत्रित केले जाते.
जपानमध्ये राजस्थानी सांस्कृतिक चित्रकलेची मागणी वाढत आहे. मेगुमी ह्या दरवर्षी जपानहून दिवाळी दरम्यान राजरथानात मुक्कामी येतात. सध्या त्या बागरू गावात पेइंग गेस्ट म्हणून मुक्कामी आहेत. उन्हाळा ते दिवाळीदरम्यान त्या जपानला जातात व पुन्हा परततात. दहा वर्षापासून त्यांचा हा प्रवास निरंतर सुरू आहे. मेगुमी ह्या बागरू गावात अब्दुल शाहिद यांचेकडे नैसर्गिक रंगापासून ब्लॉक प्रिंटिंग से काम करतात. याशिवाय त्यांना जोधपुर, जेसलमेर सारख्या मोठ्या शहरात ब्लॉक व केशकर्तन कलेसाठी बोलावल्या जाते. जपान मध्ये उंट प्राणी नसल्याने त्या भारतात कापडावर नैसर्गिक रंगात ब्लॉक प्रिटींग करतात. आणि जपानमध्ये ते त्याचा प्रचार व प्रसार करतात. जपानमध्ये कार्पेटवर केश कर्तनचे धडे देतात. भारतातील वास्तव्यादरम्यान त्या हिन्दी व राजस्थानी भाषा शिकल्या. मेगुमी उगला केवळ हिंदी व राजस्थानी भाषेत बोलत नाही तर उत्तम सुरात गातात सुध्दा. निवास दरम्यान त्या उत्तम भाकरी थापतात शिवाय घराच्या साफसफाईचे काम करतात. सवड मिळाली की शेतातील कामे सुध्दा आवडीने करतात. मेगुमीला भारत आपला वाटत असून तिच्यातील हे देश प्रेम बघून मेगुमीच्या आई वडिलांना भारतात येण्याची ओठ वाढली आहे.
(सौजन्य – बीबीसी)