लेडी टारझन – पद्मश्री जमुना तुडू
लेडी टारझन – पद्मश्री जमुना तुडू
तशी ती मुळची ओडिसाची पण लग्न झारखंडमधील पोटका या गावात झाल्यावर ती कायम स्वरुपी झारखंडची नागरिक झाली. माहेरी वडिलांनी दिलेले वृक्ष संगोपनाचे धडे आणि सासरला वृक्षतोडीचा प्रवास बघून ती विचलित झाली. नववधू म्हणून तिने दोन आठवडे स्वतः वृक्षतोड केली मग नंतर तिने थेट लाकूड माफिया आणि नक्षलवाद्यांनी निर्दयीपणे केलेल्या जंगलतोडीच्या विध्वंसक परिणामांविरुद्ध लढा उभारून आपल्या कार्याची चुणूक दाखविली. पंतप्रधानांनी तिच्या कार्याचा गौरव म्हणून ‘लेडी टारझन’ हि पदवी बहाल केली. हि लेडी टारझन म्हणजे पद्मश्री जमुना तुडू.
जमुनाबाईनी गत 34 वर्षांपासून पर्यावरण संरक्षण क्षेत्रात काम करत सामुहिक प्रयत्नातून 30 लाखांहून अधिक रोपे लावली. गावातील महिलांना एकत्रित करत जंगल माफियाने झाडे तोडल्याचा आवाज ऐकताच महिलांचा एक गट डोंगराकडे धावत असे. माफियांशी अनेक चकमकी झाल्या. माफियांनी अनेकदा जमुनाबाईवर प्राणघातक हल्ला केला. असे असूनही ती घाबरली नाही आणि माफियांशी लढत राहिली. हळुहळु उजाड आणि झाडांनी नापीक असलेला डोंगर हिरवळीच्या सालच्या झाडांनी बहरला. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांद्वारे, त्यांनी जवळपास 50 हेक्टर मौल्यवान वनजमीन यशस्वीरित्या संरक्षित केली आहे. ती लोकांना वाचवण्यासाठी झाडे आणि वनस्पतींशी नाते प्रस्थापित करण्यासाठी प्रेरित करते. दरवर्षी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर ती झाडे आणि झाडांना आपला भाऊ मानते आणि त्यांना राखी बांधते आणि त्यांचे जतन करण्याची शपथही घेते. सध्याच्या परिस्थितीत, झाडे-झाडे बेवारस कापण्याचा हा परिणाम आहे की संपूर्ण देशाला कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी झाडे लावणे हाच पर्याय आहे. प्रत्येक आनंदात व उत्सवात प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक प्रसंगी किमान पाच झाडे लावली पाहिजेत असे जमुनाबाई सांगतात.
जमुना तुडू यांना 1996 मध्ये इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार, 2018 मध्ये वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (WTI) पुरस्कार, 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कार तसेच मार्च 2020 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले.