गाढवाचे वाढले भाव
गाढवं हा शब्द उच्चारला तरी एखाद्याचा अवमान समजला जातो पण ह्या प्राण्याला काही ठिकाणी मोठ्या आदराने बघितल्या जाते. त्याला कारणही तसेच आहे. ह्या गाढविणीपासून मिळणाऱ्या दुधाला जागतिक स्तरावर प्रचंड मागणी वाढत आहे. गत दोन तीन वर्षात अनेक मुख्य वाहिनीवर गाढवीणीच्या दुधाची बातमी मोठ्या प्रमाणावर बघितल्या गेली आहे. पूर्वी केवळ ओझे वाह्ण्यासाठी ह्या प्राण्याचा वापर केल्या जायचा. गाढवाचे पालनपोषण करणारे लोकांपैकी काही मोजकेच लोकं ह्या गाढविणीचे दुध काढायचे व त्याचा वापर कुटुंबात करायचे. आता मात्र ह्या दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात 2018 नंतर झालेल्या पशु गणनेनुसार सध्या एक सव्वा लाखाच्या घरात गाढव शिल्लक राहिले आहे. आता तर गाढविणच्या दुधासाठी स्पेशल डेअरी उघडल्या जात आहे. ज्या लोकांना गायीच्या दुधाची अलर्जी असते, त्यांच्यासाठी हे दूध लाभदायक ठरतं. यात अँटी-एजिंग, अँटि-ऑक्सिडेंट और रीजेनेरेटिंग कंपाउंड्स असतात. व्हिटामिन ए, बी-1, बी-2, बी-6, व्हिटामिन-डी और व्हिटामिन-ई यांचाही समावेश असतो. यामुळे त्वचा मऊ बनण्यास मदत होते. हे दूध मानवी दूधासारखं असतं, ज्यात प्रोटीन आणि चरबीचं प्रमाण कमी असतं, पण लॅक्टॉस मोठ्या प्रमाणावर असतं. हे दूध लवकर नासतं आणि त्यामुळे यापासून पनीर बनविल्या जात नाही.
का वाढतेय मागणी :-
पूर्वी या दुधावर संशोधन झाले नव्हते आता युरोप सारख्या देशात संशोधन झाल्यामुळे पेशींना ठीक करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठीचे गुण या दुधात असल्याचे लोकांना कळले आहे. यासोबत या दुधापासून तूप, दुध पावडर, सौंदर्य प्रसाधने, औषधी म्हणून याचा वापर वाढला आहे. गाढविणीच्या दूधापासून बनलेलं साबण, क्रीम आणि मॉइश्चरायझरला बाजारात मागणी वाढत आहे. दिल्लीसारख्या शहरात या दुधासाठी ऑर्गेनिको नावाचं स्टार्टअप सुरू केले आहे. या सर्व गुणधर्मा मुळे गाढवीणचे दुध चक्क पाच हजार रुपये पेक्षा जास्त दराने खपत आहे. यामुळे गाढवांच्या स्पीति, हराली या गाढवाच्या प्रजातीला सोन्याचे दिवस प्राप्त झाले आहे.
फॅन्सी वस्तू आवाक्याबाहेर :-
आंतरराष्ट्रीय स्तरावर गाढवापासून बनणाऱ्या वस्तूंची मागणी वाढत असल्याने देशविदेशात गाढवांचे फार्म ची संख्या वाढत आहे. फार्म मध्ये एका गाढवीण पासून सुमारे तीन लिटर दुध दिवसातून दोन ते तीन वेळेस मशीन द्वारा काढल्या जाते. गाढवांच्या मृत्युनंतर मांस विक्रीतून सुद्धा चांगली किंमत प्राप्त होते. चामडी पासून जोडे, सोफे, बेल्ट ,पर्स बनविल्या जातात . सोफे वीस हजार पेक्षा अधिक किमतीत तर जोडे पर्स साधारण पाच हजार पेक्षा अधिक किमतीत विकल्या जातात. चामडी पासून बनविलेल्या जेकेट साधारणता पन्नास हजार रुपयात विकल्या जात असल्याने गाढवांचे सुद्धा भाव वधारले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.