गोल्डन टायगर @ काझीरंगा
गोल्डन टायगर @ काझीरंगा
आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सफारीदरम्यान एक सोनेरी वाघ दिसून आल्याने देशभरात हा वाघ चर्चेचा विषय ठरला आहे. कोईम्बतूर येथील वन्यजीव छायाचित्रकार गौरव रामनारायणन यांनी 24 जानेवारी रोजी दूर्मिळ सोनेरी कोट असलेल्या वाघाचे छायाचित्र काढले. गौरव रामनारायणन हे ऑस्ट्रेलियाहून आलेल्या पाहुण्यांना सफारीसाठी घेऊन जात असताना दुपारी चारच्या सुमारास नर प्रौढ सोन्याचा वाघ दिसला.
कांझिरंगात सोनेरी कोट असलेले एकापेक्षा जास्त वाघ असल्याची चर्चा आहे. परंतु ते एकाच वेळी अस्तित्वात होते की एकामागून एक आले होते याचा अचूक अंदाज नाही. 2019 मध्ये सुध्दा अश्याच प्रकारच्या वाघाचा फोटो वायरल झाला होता.
नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बेंगळुरू येथील प्रा. उमा रामकृष्णन यांची टीम अश्या प्रकारच्या वाघांचा अभ्यास करत आहे. “हा वाघ सोनेरी दिसतो कारण त्यात उत्परिवर्तन किंवा अनुवांशिक प्रकार आहे. त्यामुळे काळा रंग गायब आहे. मुळात वाघांना तीन रंग असतात – काळा, केशरी आणि पांढरा. या वाघाच्या बाबतीत, काळा रंग गायब आहे आणि तो किंचित फिकट झाले आहे. नारिंगी देखील फिकट झाली आहे,” असे प्रा.रामकृष्णन यांचे मत आहे.
निलगिरीत आढळले दोन पांढरे वाघ
2017 मध्ये निलगिरीच्या जंगलामध्ये दोन पांढरे वाघ आढळ ल्याची नोंद झाली आहे. ते दोन्ही वाघ हे दुर्मिळ फिकट कातळीचे होते. विशेष म्हणजे या वाघाची आई व बहीण ही सामान्य रंगाची असल्याचे बोलले जाते.