Warning: foreach() argument must be of type array|object, bool given in /home/u114081366/domains/nisargdarpan.com/public_html/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/disable-comments.php on line 117

Warning: foreach() argument must be of type array|object, bool given in /home/u114081366/domains/nisargdarpan.com/public_html/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/disable-comments.php on line 117
मेळघाटातील गोलाई बनतेय ‘कर्मचाऱ्यांचे गावं’ – nisargdarpan
स्पर्धा विश्व

मेळघाटातील गोलाई बनतेय ‘कर्मचाऱ्यांचे गावं’

प्राथमिक शिक्षकाने रचिला पाया...माध्यमिक शाळा चढवतेय कळस

मेळघाटातील गोलाई बनतेय ‘कर्मचाऱ्यांचे गावं’

प्राथमिक शिक्षकाने रचिला पाया…माध्यमिक शाळा चढवतेय कळस

गोलाई हे मेळघाटच्या उंच टोकावरील अतिदुर्गम गाव. अमरावतीपासून तब्बल 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावातील युवकांच्या अभ्यासामुळे हे गाव चर्चेत येत आहे. या गावातील अडीचशे उंबरठ्याच्या आत तब्बल 133 कर्मचारी घडल्याने ‘कर्मचाऱ्यांचे गावं’ म्हणून नवीन ओळख निर्माण होत आहे. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा गोलाईचे शिक्षक स्व. महेश पाटील या शिक्षकाने स्पर्धा परीक्षेचे बीजारोपण करत पायाभरणी केली असून माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अतुल मैंद हे माध्यमिक शिक्षणातून त्यावर कळस चढविण्याचे करत करत आहे.

1660 लोकसंख्येचे गोलाई हे गावं येथील सात धबधब्यांमुळे सर्वत्र परिचित आहे, पण सध्या या गावातील युवकांनी अभ्यासाच्या जोरावर या गावाची नवीन ओळख निर्माण केली आहे. अतीदुर्गम असल्याने केश कर्तनालयाची व्यवस्था नसलेल्या या गावातील मुलांना नाईलाजाने एकमेकांचे केश कर्तन करावे लागते. 2010 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील महेश पाटील व त्यांच्या भावाने या गावातील मुलांना उज्वल भविष्याचे स्वप्न दाखवत अभ्यासाची गोडी निर्माण केली. कधी स्वतःच्या खोलीवर , कधी निसर्गात भटकंती करताना महेश पाटील यांनी येथील मुलांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यांनी केलेल्या या पायाभरणीमुळे आज या छोट्याशा गावातील युवक पाच डॉक्टर, सतरा पोलीस, पंचवीस शिक्षक, भारतीय सैनिक व ईतर वर्ग तीनच्या शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत आहे.

स्व. महेश पाटील यांच्या नंतर सध्या माध्यमिक शाळा गोलाई येथील मुख्याध्यापक अतुल मैंद हे त्यांच्या शिक्षकांच्या सहकार्याने या मुलांना अभ्यासातील सातत्य टिकवून ठेवत विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहे. पुण्यातील लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट या संस्थेच्या मार्गदर्शन व ईतर सहकार्याने या गावातील युवक – युवती एमबीबीएस, एम.एस., बीएएमएस, बिडीएस व फार्मसिस्ट घडत आहे.

शिक्षकांचा वॉलपेपर :
आजच्या तरुणाईच्या मोबाईल फोनमधील सातत्याने बदलणारे स्टेटस, प्रोफाईल व वॉलपेपर चर्चेचे विषय असताना या गावाला अभ्यासाचे वळण लावणाऱ्या प्राथमिक शिक्षकाचे फोटो अनेक युवकांच्या वॉलपेपरवर बघायला मिळतात. 2018 मध्ये अचानक हृदय विकाराने एक्झीट घेणाऱ्या महेश पाटील सरांच्या आठवणीत असलेली ही एक प्रकारची श्रद्धांजली आहे.

अरुण नागरगोजे

अरुण नागरगोजे होणार ठाणेदार :-
2010 मध्ये डॉ. शिवाजी कातखेडे यांच्या रूपाने एमबीबीएस एम.एस पहिला उच्च शिक्षित तरुण हा वर्ग एक पदावर कार्यरत असून नुकताच अरुण नागरगोजे या युवकाने पीएसआय परीक्षेतील मुलाखत व शारीरिक चाचणी पार करत नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत आहे.

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close