जेमिनी ठरणार तुमची पर्सनल असिस्टंट
जेमिनी ठरणार तुमची पर्सनल असिस्टंट
बोलणे से सबकुछ होता है…या वाक्या प्रमाणे तुम्ही तुमच्या मनातील एखादा प्रश्न प्रॉम्प्टच्या स्वरूपात जेमिनी ला विचारला तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. तुमच्या मनात आता जेमिनी बद्दल उत्सुकता वाढली असेल…चला तर जेमिनी बद्दल अधिक माहिती मिळवू या.
जेमिनी हे कोणत्या मुलीचे नाव नसून गुगल द्वारा तयार करण्यात आलेले नवीन AI टूल्स आहे. यापूर्वी गुगल ने बार्ड ची निर्मिती केली होती त्याचेच रूपांतर आता जेमिनी मध्ये करण्यात आले आहे. जेमिनी लेख, कविता, कथा, ब्लॉग पोस्ट, इमेल, संवाद, कोडिंग आदी कामे सहज करणार आहे.जेमिनी गाणी, पटकथा, संगीत आणि चित्र तयार करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरणार आहे.उदाहरणार्थ तुम्हाला चिखलदरा स्काय वॉक वर वाघांची सभा बघायची आहे तर तुम्ही सहज अश्या आशयाची प्रॉम्प्ट तयार केल्यास क्षणार्धात तुम्हाला चित्र तयार करून देणार आहे. यामुळे व्यावसायिक जगतात चॅटबॉट विकसित करणे सोपे जाणार आहे. जेमिनी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी वरदान ठरणार आहे.
जेमिनी एप्स चा वापर करण्यासाठी फक्त गुगल खाते असणे गरजेचे आहे.गुगल सर्च इंजिन वर आपण gemini. google.com टाकल्यास सहज उपलब्ध होणार आहे.
जेमिनी आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे जेमिनी जगातील 100 पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतर करू शकणार आहे. हे टूल्स पर्सनल डॉक्युमेंट, ड्राईव्ह व यु ट्यूब साठी कामी येणार आहे. गुगल चे सर्व एप्स ची माहिती यावर कनेक्ट करता येणार आहे. यामध्ये पोस्ट वाचण्यासह श्रवण सुद्धा करता येणार आहे.
थोडक्यात काय तर हे टूल्स AI तंत्रज्ञान द्वारा कठीण कार्य सहज सुलभ होणार आहे. यात उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरले असल्याने
हे वापरायला सोपे जाणार आहे. यामुळे Chat GPT ला तगडे आव्हान मिळणार असल्याचे बोलले जात आहे.