भारतातील सिलेब्रिटी टायगर
भारतात जगातील सुमारे 70% वाघ वास्तव्य करतात. जगभरात भारतीय वाघांचा दबदबा आहे. त्यामुळे अनेक परदेशी व्यक्ती भारतात वाघ बघायला येतात. परदेशी व्यक्तीना ताजमहलचे पर्यटन करतांना राजस्थान जवळ असल्याने त्यांची सर्वाधिक पसंती रणथंबोरला असते. भारतातील अनेक सिलेब्रिटीना ताडोबाचे वेड आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर सारखा जगप्रसिद्ध व्यक्ती दरवर्षी ताडोबात येतो. ज्याप्रमाने पुरुष व स्त्रियांमध्ये सिलेब्रिटी आहेत त्याचप्रमाणे वाघाच्या दुनियेत सुद्धा अनेक सिलेब्रिटी आहे. ज्यांच्यामुळे वनविभाग, पर्यटन विभाग, हॉटेल चालकांना करोडो रूपयांचा फायदा होतो. वाघ राष्ट्रीय प्राणी सोबतच तो नगदी पैसे मिळवून देणारा एक सिलेब्रिटी आहे. वाघाच्या प्रसिद्धीमुळे हॉलीवूड व बॉलीवूडमध्ये चित्रपट बनले शिवाय पोस्ट तिकिट पासून ते अन्य ठिकाणी सुद्धा वाघाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
बिग डॅडी वाघडोह :-
सर्वाधिक नाव असलेला असलेला वाघ म्हणजे ताडोबा मधील वाघडोह. ताडोबा जंगलातील वाघडोह नामक नाल्याजवळ जन्म झाल्याने या वाघाला ‘वाघडोह’ असे नामकरण करण्यात आले, गव्यासोबत लढाई करतांना त्याच्या चेहऱ्यावर खुणा झाल्याने पुढे त्याला ‘स्केअरफेस’ या नावाने ओळखल्या जावू लागले. 17 वर्षाच्या काळात त्याने 40 बच्चे जन्माला घातल्याने त्याचे ‘बिग डॅडी’ म्हणून नवीन नामकरण करण्यात आले.
अपराजित बजरंग:-
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात 2015 मध्ये एन्ट्री करणारा बजरंग याचे ‘वाघडोह’ सोबत द्वंद झाले. वाघडोहला टक्कर देऊन ताडोबावर आपले साम्राज्य स्थापन करणारा बजरंग कोठून आला हे अद्याप हि रहस्य आहे. बजरंगला 8 वाघिणी कडून तब्बल 30 बच्चे झाले, वाघडोह नंतर ताडोबातील सर्वाधिक ताकदवर वाघ म्हणून ‘बजरंग’ याची नोंद आहे. आजपर्यंत ईतर कुठल्याही वाघाकडून न हरण्याचा विक्रम बजरंग च्या नावावर आहे.
रॉकस्टार मुन्ना :-
मध्यप्रदेशातील ROCK STAR म्हणून मुन्नाची ओळख आहे. या वाघाचे नामकरण हे तेथील एका गाईड च्या नावावरुन करण्यात आले. गाईड प्रमाणे हा वाघ लंगडत असल्याने इतर गाईड कडून या वाघाला ‘मुन्ना’ असे नामकरण मिळाले. मुन्ना च्या चेहऱ्यावर PM अशी खून असल्याने त्याला PRIME MINISTER या नावाने सुद्धा ओळखल्या जाऊ लागले. या वाघावर मानवी हल्ल्याचा आरोप झाल्याने अखेरच्या काळात भोपाळच्या प्राणी संग्रहालयात त्याची रवानगी झाली.
बिनधास्त उस्तादः
राजस्थानच्या रणथंबोर जंगलात झुमरू व गायत्री यांचा बच्चा म्हणजे उस्ताद. धीट, रागीट व बिनधास्त असे त्याचे वर्णन केले आहे. बिनधास्त स्वभावामुळे त्याला उस्ताद है नामकरण करण्यात आले. उस्तादवर चार लोकांची शिकार केल्याचा आरोप आहे. या चारमध्ये 2 वन कर्मचारी होते. या प्रकरणाने तो अधिक चर्चेत आला होता. त्यामुळे त्याची रवानगी जयपूर येथील जैव उद्यानात करण्यात आली.
क्रोकोडाईल किलर मछली :-
सर्वात जास्त उन्हाळे – पावसाळे पाहण्याचा रेकॉर्ड मछली च्या नावावर आहे. 1996 मध्ये तिचा जन्म झाला. तिच्या चेहऱ्यावर माश्या सारखे पट्टे असल्याने तिचे मछली हे नामकरण झाले. राजस्थान मधील रणथंबोर जंगलात ॥ पिल्लांना जन्म देणारी मछलीने 14 फुट मगरीची शिकार केली. या प्रकरण मुळे ती जगप्रसिद्ध झाली. सर्वात जास्त फोटोग्राफिक वाघीण म्हणून तिने आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. या वाघिणीवर ‘क्वीन ऑफ टायगर’ हा माहितीपट वनविण्यात आला. पोस्ट विभागाने सुद्धा तिच्या स्मृती प्रीत्यर्थ तिकीट प्रकाशित केले.
ग्रँड जय :-
वाघडोह नंतर देशातील सर्वांत मोठा वाघ. 2011 मध्ये नागझिरा जंगलातील माई वाघिणीला दोन बच्चे होते. त्यातील एक जय तर दुसरा विरु. शोले चित्रपटावरून हे नाव गाईड द्वारा देण्यात आले. जयने नागझिरा ते उमरेड प्रवास प्रवास केला. नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही सुमारे चारशे साडे चारशे किलोमीटर विस्तारात त्याचा दरारा होता. जय बेपत्ता झाल्यावर अनेक ठिकाणी मोर्चे कॅण्डल मार्च निघाले अगदी विधानसभा ते संसद पर्यंत जयच्या बेपत्ता होण्याचा डंका वाजला होता.
लेख सदर्भ: श्री संजय करकरे (नागपूर)