हत्तीही करतात वर्षश्राद्ध
मानवात एखादी व्यक्ती मृत झाल्यास त्याला मूठ माती, किंवा ज्वलाग्नी देऊन तिसरा दिवस , दहावा, तेरवी व वर्षश्राद्ध करण्याची परंपरा आहे, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एखाद्या हत्तीचा मृत्यू झाल्यास या प्राणी समूहात मयतला जमलेले हत्ती स्पर्श,अश्रू, व ईतर शाब्दिक व अशाब्दीक संवाद माध्यमद्वारा मृत कुटुंबियांचे सांत्वन करतात. पायाने, सोंडेने गड्डा करून त्यात हत्तीचे प्रेताला ढकलून त्यावर माती व पालापाचोळा टाकतात. प्राणी किंवा पक्षी यांनी मृत शरीराची अवहेलना करू नये ही त्यामागील भावना आहे. एवढेच नव्हे तर तब्बल वर्षभरानंतर ज्या ठिकाणी हत्तीचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी सर्व हत्ती एकत्र येतात यासाठी कधीकधी ते कित्येक मैल प्रवास पार करून हे अंतर गाठतात व वर्षपूर्तीप्रित्यर्थ सांत्वन व्यक्त करतात.
*500 वर्षाची आठवण*
स्मरणशक्ती बाबत म्हणाल हत्तींना तब्बल साडे चारशे- पाचशे वर्षापूर्वीची आठवण राहते. आता तुम्हाला वाटेल हत्तीची आयुर्मर्यादा कमी मग स्मरणशक्ती पाचशे वर्ष कशी राहणार ? आपल्या घरी एखाद्याला जसा हृदयरोग राहतो तो पुढल्या पिढीकडे संक्रमित होतो अगदी त्याचप्रमाणे सुमारे सहा पिढीतील स्मरणशक्ती हत्तींना वारसारूपाने प्राप्त होते. याच पिढीजात स्मरणशक्तीच्या सहाय्याने अन्नाच्या शोधार्थ ओरिसा, छत्तीसगड पार करून गडचिरोली येथे काही हत्ती तर कर्नाटक, गोवा राज्य पार करत कोल्हापूर येथील भागात हत्तीचे कळप आले आहे. गडचिरोली च्या हत्तीच्या बाबतीत साडे तीनशे वर्षानंतर हे घडले आहे. हत्तींना बांबू, ऊस, मका सारखे तृणजीवी वनस्पती आवडते. हे अन्न ग्रहन करताना उसासारखे पीक मुळासकट उपटून नंतर झटकून खात असल्याने शेतकऱ्यांचे पूर्ण पीक नष्ट होते.
हत्ती हिंस्त्र का होतो ?
हत्ती ला प्रेमळ,मायाळू, लाजाळू,कृतज्ञ असे नानाविध विशेषण लावली जातात.एवढं असूनही मग हत्ती हिंस्त्र बनतात त्याची कारणे खालीलप्रमाणे.
1 त्याला विनाकारण त्रास दिला तर
2 हत्तीच्या पिलांची खोड काढली तर
3 वारंवार हत्तीची छेड काढली किंवा सन्मान दुखावला तर हत्ती मनात राग धरतो.
निसर्ग दर्पण आपणासाठी विनामूल्य आहे.कृपया आपण हा अंक आवडल्यास इतरांनाही शेयर करावा.