तापमानवाढीने व्यक्ती होणार पागल
मागील 11 महिने तापमानवाढीचे एकापेक्षा एक रेकॉर्ड ब्रेक होत आहे. जानेवारी महिन्याचे रेकॉर्ड फेब्रुवारी महिन्याने तर फेब्रुवारी महिन्याचे रेकॉर्ड मार्चने मोडले. मे महिन्यातील नवतपाने तर कहरच केला. जर याप्रमाणे तापमानात वाढ होत राहिली तर पुढील पाच सहा वर्षात तापमान 60 डिग्री पार करेल, यात शंका नाही. ज्याप्रमाणे शरीरात ताप शिरल्यावर व्यक्ती अस्वस्थ होतो. त्याचा परिणाम पचनतंत्रासह मानसिक स्वास्थावर होतो. जर तापमानात अशीच वाढ होत गेली तर 55 ते 60 डिग्री तापमानात लोकांचे मानसिक संतुलन बिघडून विक्षिप्तपणा वाढत जाणार आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास तुम्ही उन्हाळ्यात सतत कुलर किंवा एसीत राहत असाल आणि अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाला तर तुम्ही अस्वस्थ होता, कारण मानवाला स्वस्थ राहण्यासाठी शरीराचे तापमान योग्य हवे. एका घरात एक व्यक्ती विक्षिप्त झाली तर घरातील अनेक लोकांवर त्याचा परिणाम होतो हळूहळू समाजात सुद्धा तसे परिणाम दिसून येईल. यामुळे अगोदर लोकं पागल होईल ते रस्त्यांवर वेडसर व्यक्तीप्रमाणे इतरांशी वाद घालेल, प्रसंगी मारामारी करेल अतिरेक झाल्यावर त्यांचा मृत्यू होईल अशी शक्यता गीता अभ्यासक आचार्य प्रशांत त्रिपाठी यांनी वर्तविली आहे.
गरिबांकडे कुलर, एसी सारखे संसाधने नसल्याने अगोदर गरीब लोकं पागल होईल नंतर श्रीमंत व्यक्तीकडील संसाधने कमी पडल्यावर त्यांच्यावर सुद्धा हा परिणाम होईल. तापमान वाढ हे असेच वाढत राहिले तर येत्या पाच ते दहा वर्षात हे चित्र समाजात बघायला मिळेल. तापमान वाढीमुळे कुत्र्याच्या चावण्याच्या घटनेत पूर्वीपेक्षा 6 पट वाढ मागील एका महिन्यात झाली. सोबतच गाय, बकरी सारखे पाळीव पशुसुद्धा आक्रमक होत आहे. पक्ष्यांचा विणीचा काळ, शेतीचा हंगाम आदीमध्ये बदल होत आहे. आपल्या घरातील वाढलेले तापमान कुलर किंवा ए.सी द्वारा संतुलित करता येते पण हिटिंग प्रक्रियापेक्षा कुलिंग प्रक्रिया करायला दुप्पट उर्जा लागते. आपल्या गाडीतील एसी सुरु केल्यास गाडीच्या इंजिनवर लोड येतो परंतु गाडीतील हिटर लावल्यावर गाडीच्या इंजिनवर कुठलाही परिणाम जाणवत नाही, त्यामुळे तापमान अधिक वाढले तर तापमान आणखी थंड करायला दुप्पट उर्जा खर्च होईल. यामुळे अधिक कार्बन उत्सर्जित होईल.
तापमान वाढले तर गंगा व यमुनेचे उगम स्त्रोत नष्ट होईल. सध्या भारतातील अनेक बारमाही नद्या आटलेल्या आहे. सहारा वाळवंट कधीकाळी समृद्ध जंगल होते. सध्या भारतातील एक सर्वसाधारण व्यक्ती अडीच टन कार्बन उत्सर्जित करतो परंतु सिलेब्रिटी व्यक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत अधिक कार्बन उत्सर्जित करतात. इलेक्ट्रिक वाहन बनवायला सर्वाधिक कार्बन उत्सर्जित होते कारण ह्या गाड्या लिथियम बॅटेरी पासून बनविल्या जातात आणि लिथियम बॅटेरी बनविण्यासाठी पाण्याचा वापर अधिक केला जातो. भविष्यात ग्लोबल वार्मिंग सारखे धोके निर्माण होऊ नये याकरिता आताच त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात झाडे आहेत तेथील तापमान व जिथे झाडे नाही तेथील तापमान या दोन्ही ठिकाणी आपल्याला वेगवेगळा अनुभव येतोच. आज (दिनांक 5 जून) जागतिक पर्यावरण दिन आहे तेव्हा आपणही या पृथ्वीला पुन्हा हिरवेगार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया.
संदर्भ :- आचार्य प्रशांत यांची व्हिडिओ लिंक https://youtu.be/-7q7hKspV7Y?si=GiaARErYRSOxTLAk