डबल डेकर नैसर्गिक पूल

डबल डेकर नैसर्गिक पूल
तुम्ही आम्ही केवळ माती, सिमेंट, लोह किंवा फार फार तर स्टील धातू पासून तयार केलेले पूल बघितले आहे, पण फक्त निसर्गातून तयार झालेला पूल बघितला का ? नाही ना पण फक्त नैसर्गिक संसाधनापासून सुद्धा पुलं तयार करता येतात. तुम्हाला ते बघायचे असेल तर एकदा पूर्व भारताची सैर करावी लागेल.सेवन सिस्टर राज्यातील मेघालय मध्ये झाडांच्या मुळांपासून तयार केलेले पूल अर्थात ‘लिव्हिंग रूट ब्रीज’ अनेक ठिकाणी बघायला मिळतात.काही गावांमध्ये तर त्यांची संख्या शंभराच्या वर असे पूल बघायला मिळतात.
कश्यासाठी बनवितात हे पूल ? असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल ज्या ठिकाणी डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे अश्या प्रदेशात पाण्याचे प्रवाह किंवा खोल दरी ,नदी ओलांडून पलीकडे जाण्यासाठी असे पूल बनविले जातात. येथील काही पूल हे शंभर दीडशे वर जुने आहेत. तर निवडक पूल हे २०० वर्ष जुने असल्याच्या नोंदी आहेत.
कश्यापासून बनवितात हे पूल ?
हे पूल बनविण्यासाठी साधारण पंधरा ते वीस वर्षाचा कालावधी लागतो.कारण जिथे हा पूल हवा आहे तिथे रबर,सुपारी, बांबू आणि वडाच्या पारंब्या सारख्या जिवंत वृक्षांचा वापर केला जातो. असे वृक्षांच्या फांद्या ,पारंब्या लांब होऊन बांबूच्या मदतीने त्याला आकार दिला जातो. पाईनुरसला या गावात सुमारे १६० फुट लांब पूल आहे. विशेष म्हणजे एकावेळी ५० लोकं आरामात हा पूल ओलांडू शकतात एवढा मजबूत तो बनविला आहे. हा पूल आपल्या लोह सिमेंट च्या पुलापेक्षा मजबूत बनतो. स्थानिक भागातील मठ,व जयजयकार जमातीचे लोकं या पुलाची निर्मिती करतात. चेरापुंजी मध्ये डबल डेक्कर पूल बघायला मिळतो.ज्याची निर्मिती २०० वर्षापूर्वी करण्यात आली. या पुलांचा समावेश वर्ल्ड हेरीटेज मध्ये करण्यात आलेला आहे. आता अलीकडे सर्वाधिक उपयोग पर्यटनासाठी होतो. या पुलाला पाहून पर्यटक फोटो काढल्याशिवाय जात नाही.