निसर्गातील अचूक थर्मामीटर – क्रिकेट
निसर्गातील अचूक थर्मामीटर – क्रिकेट
क्रिकेट हा शब्द उच्चारला तर डोळ्यासमोर येते मैदान व दोन संघ व त्यातील प्रत्येकी 11 खेळाडू. पण आज ज्या क्रिकेट बद्दल आपण जाणून घेणार आहो क्रीडा प्रकार नसून एक किडा प्रकार आहे. जगात क्रिकेट या कीटकाच्या सुमारे 900 प्रजाती आहे. यातील काही शाकाहारी तर काही मिश्रहारी आहेत. या किटकाचे वैशिष्ट म्हणजे तुम्ही या किटकाचे 14 सेकंद अचूक चिर्पिंगची( किलबिलाट) नोंद केली तर तुम्हाला त्या परिसरातील अचूक तापमान कळते.
हे कीटक गवताळ प्रदेश, झुडुपे आणि जंगल, दलदल, समुद्रकिनारे व गुहांपर्यंत विविध अधिवासांमध्ये आढळतात. क्रिकेट हे प्रामुख्याने निशाचर असतात. क्रिकेट हे लहान ते मध्यम आकाराचे कीटक असतात ज्यांचे मुख्यतः दंडगोलाकार, काहीसे उभे चपटे शरीर असतात. विशेष म्हणजे या किटकाला ऐकण्यासाठी आपल्या सारखे कान नसतात. कंपनाद्वारे त्यांचा संवाद होतो. अनेक प्रजातींमध्ये, पंख उड्डाणासाठी अनुकूल नसतात.
क्रिकेटचा किलबिलाट :-
क्रिकेट त्यांच्या किलबिलाटासाठी ओळखले जाते (हा आवाज फक्त नर करतात.) किलबिलाट हा त्यांचा डावा पुढचा भाग ४५ अंशाच्या कोनात वर करून उजव्या पुढच्या बाजूच्या वरच्या मागच्या काठावर घासून तयार केला जातो, या ध्वनी निर्मिती क्रियेला स्ट्रीड्यूलेशन म्हणतात. हे या किटकातील एक प्रकारचे गाणे आहे. हे कीटक दोन प्रकारे गातात. एक म्हणजे मादीला आकर्षित करण्यासाठी, याला कॉलिंग म्हणतात. तर दुसरे गाणे असते आपली टेरीटोरी दर्शविण्यासाठी त्याला कोर्टिंग म्हणतात. हे गाणे फार कर्कश स्वरूपाचे असते.
अचूक तापमापक :-
क्रिकेट तापमानानुसार वेगवेगळ्या दरात किलबिलाट करतात. बहुतेक प्रजाती तापमान जितके जास्त असेल तितके जास्त दराने किलबिलाट करतात. एका सामान्य प्रजातीमध्ये 13 °C (55 °F) दर मिनिटाला सुमारे 62 किलबिलाट करतात. तापमान आणि किलबिलाटाचा दर यांच्यातील संबंध डॉल्बियरचा नियम म्हणून ओळखला जातो . या नियमानुसार 14 सेकंदात तयार होणाऱ्या किलबिलाटांची संख्या मोजली जाते आणि 40 जोडल्यास तापमान अंश फॅरेनहाइटमध्ये अंदाजे होते.