रक्तशुद्ध करणारी वायवर्णा Crataeva nurvala
रक्तशुद्ध करणारी वायवर्णा Crataeva nurvala
वायवर्णा हि पानझडी वनस्पती असून ती भारत, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार या देशातील वनांमध्ये, बागांमध्ये आणि रस्त्याच्या दुतर्फा आधळून येतात. या वृक्षाला मराठीत हाडवर्णा किंवा वरुण या नावाने संस्कृतमध्ये अश्मरिघ्न, त्रिपर्ण, बिल्वपत्र, वरुण, वरुणक, वरुणा तर हिंदीत वरना, बार्ना, बिलियाना, वाखुन्ना या नावाने ओळखल्या जाते. हा वृक्ष सुमारे ९ ते १२ मी. पर्यंत उंच वाढतो. वायवर्णा वृक्षाचे लाकूड पिवळसर, मध्यम, कठीण व गुळगुळीत असते. ढोल, फण्या, सजावटी सामान, आगकाड्या इत्यादींसाठी ते वापरतात. चुना चिकट व कठीण करण्यासाठी फळातील मगज, तर रंग पक्का करण्यासाठी सालीची पूड वापरतात. फुले हिरवट पांढरी, हलकी पिवळसर किंवा मलईदार रंगाची आणि सुवासिक असतात. बियांमध्ये ताज्या पिवळ्या लगद्यामध्ये गुंतलेल्या अनेक बिया असतात. औषधी वनस्पतींचा फुलांचा हंगाम मार्च महिन्यात असतो आणि फळे जून महिन्यात येतात. वरुण फळांची साल रंगरंगोटीमध्ये मॉईंट म्हणून वापरली जाते.
औषधी वनस्पती :-
या वनस्पतीच्या सालीचा वापर किडनी स्टोन, मूत्रमार्गात संक्रमण सारख्या आजारावर होतो. साल जळजळ विरोधी, जंतुनाशक, रेचक आणि रक्तवाहक आहे. ही वनस्पती हृदयासाठी देखील चांगली आहे . याचा उपयोग भूक वाढविणे, पचन उत्तेजित करणे, पोटाच्या विविध विकार, शरीरातील चयापचय वाढविणे, हे अतिरिक्त बिलीरुबिन पातळी पुनर्संचयित करण्यास आणि यकृत रोगांपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते तसेच नैसर्गिक रक्त शुद्धीकरणसाठी हि वनस्पती गुणकारी आहे. ही वनस्पती रक्त प्रवाह, ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांवर तसेच शरीरातील अतिरिक्त कचरा काढून टाकण्यासाठी वापरले जाते. शरीरातील अतिरिक्त कफ आणि पित्त स्राव बाहेर काढण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. या औषधी वनस्पतीच्या सालामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म देखील असतात. झाडाची साल आतील आणि खोलवर बसलेली सूज बरी करण्यासाठी वापरली जाते. हे कफ, वात दोष दोन्ही शांत करण्यासाठी वापरले जाते. ही औषधी वनस्पती शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकते त्यामुळेलठ्ठ लोकांसाठी वरदान ठरणारी आहे.