Uncategorized

निसर्गाच्या सान्निध्यात वाढते आयुष्य

निसर्गाच्या सान्निध्यात वाढते आयुष्य

अमरत्वाचे सूत्र अद्याप शास्त्रज्ञांना सापडले नसले तरी, दीर्घायुष्य मिळवण्याचा एक सोपा आणि सुंदर मार्ग शास्त्रज्ञांनी शोधला आहे. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या अलिकडील संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या लोकांमध्ये अनेक जैविक आणि आण्विक बदल होतात, ज्यामुळे त्यांचे वय वाढते. या अभ्यासाचा निष्कर्ष ‘साइंटिफीक अॅडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

एखाद्या व्यक्तीचे जैविक वय तो कोणत्या प्रकारच्या जीवनशैलीचा अवलंब करतो, यावर अवलंबून असते. त्यामुळे जैविक वय वाढू किंवा कमी होऊ शकते. जैविक वय हे कालक्रमानुसार वयापेक्षा कमी असेल तर, लोक लवकर वृद्ध होतात. म्हातारपणात होणारे सर्व रोग त्यांच्यावर आधीच परिणाम करतात. परिणामी त्यांच्या मृत्यूची शक्यता वाढते. शास्त्रज्ञांच्या शोधात असे समोर आले की, निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्यांना दीर्घायुष्य लाभते.आयुष्य वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या खाण्याचा सल्लाही शास्त्रज्ञ देतात, तर
नव्या संशोधनातील निष्कर्ष निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम करण्यालाही प्राधान्यदेण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्यागार परिसरात राहिल्याने शरीरावर सकारात्मकपरिणाम होतो आणि आरोग्य निरोगी राहते. उत्तम आरोग्य लाभल्याने माणसाचे आयुष्य वाढते. शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी अमेरिकेतील चार शहरांची निवड केली होती, जिथे दोन वेगवेगळ्या वातावरणात राहणाऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला. सुमारे ९०० लोकांवर दोन दशकांपासून हे संशोधन करण्यात आले. हरित वातावरणाचा आरोग्यावर काय परिणाम होतो, हे शोधणे या संशोधनामागचा उद्देश होता. संबंधित व्यक्तींच्या डीएनएची तपासणी करून संशोधन पथकाने मेथिलेशन नावाचा रासायनिक बदल पाहिला. ही प्रक्रिया सामान्यतः डीएनएमध्ये घडते, परंतु जसजसे वय वाढते, तसतसे त्यात बदल दिसून येतात, याला एपिजेनेटिक क्लॉक असेही म्हटले जाते. शास्त्रज्ञांना असे दिसून आले की, जे लोक निसर्गाच्या सान्निध्यात, हिरव्यागार परिसरात राहत होते, ते अधिक तरुण होते. इतरांच्या तुलनेत त्यांचे वय अडीच वर्षे कमी वाटत होते. शास्त्रज्ञ यावर अधिक व्यापक संशोधन करीत आहेत.

 

laksh

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close