वनस्पती जगत

शक्तिवर्धक गोरखमुंडी (Sphaeranthus indicus)

शक्तिवर्धक गोरखमुंडी (Sphaeranthus indicus)

गोरखमुंडी वनस्पतीला मुंडी, मुण्डिका, श्रावणी, भिक्षु, तपोधना, मुंडी या नावाने ओळखल्या जाते. दक्षिण भारतात ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. उत्तरेकडे नुसती बोंडेच वापरतात.वातावरण बदलामुळे दक्षिण भारतात ही मुंडी उत्तम भरीव होते.

मुंडीची लहानलहान क्षुपे भाताच्या शेतात उगवतात. पाने अत्यंत कोमल, मऊ, कातरेयुक्त असतात. यास किरमिजी रंगाची फुले येतात. वास सुगंधी असतो. चव कडू असते.औषधात पंचांग वापरतात. सामान्यत: पावसाळ्याच्या शेवटी दिसू लागते आणि हिवाळ्यात याला पानं, फळं येऊ लागतात. उन्हाळ्यात हे धान्याच्या शेतातही आढळतं. याची मुळं, फुलं आणि पानं सर्व भाग (पंचांग) बर्‍याच रोगांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे. मुंडीला तुरे श्रावण महिन्याकडे येतात म्हणून हिला ‘श्रावणी’ हे नाव दिलेले आहे .

गोरखमुंडी ही एक सुवासिक औषधी वनस्पती आहे. गोरखमुंडीत काळसर लाल रंगाचे चिकट तेल व एक कडू द्रव्य असते. हे तेल त्वचा व मूत्रपिंडाद्वारे बाहरे पडते, म्हणून गोरखमुंडी घेणाऱ्या व्यक्तीच्या घामाला व लघवीला एक प्रकारचा वास असतो. मूत्रेन्द्रियाच्या रोगात मुंडीने फार फायदा होतो. हिने लघवी सुटते. इतकेच नव्हे तर मूत्रपिंडापासून मूत्रद्वारापर्यंत सर्व मार्गाचे शोधन होते. वारंवार लघवीला होणे कमी होऊन लघवीचा रंग बदलतो. त्वचाविकारात पंचाग बाटून उटणे करतात व पोटातही देतात. कुपचन विकारात जिरेचूर्णाबरोबर व मूळव्याधीत ताकाबरोबर देतात. मुंडी पुष्कळ दिवस खात राहिल्यास खोकला, गंडमाळा, शारीरिक अशक्तता, जीर्ण रोग बरे होतात, कांती सुधारते. सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी गोरखमुंडीचा वापर केला जातो. या वनस्पतीमध्ये मधुमेह, लैगिंक शक्तीत सुधारणा, डोळ्यांची दृष्टी सुधारणे, खाज , पित्ताशयातील खडे , ताप, मुळव्याध, श्वासाच्या दुर्गंधीपासून मुक्ती खोकल्यापासून पोटापर्यंतचे आजार, पोटातील जंत, अपचन, कावीळ इत्यादी अनेक आजारावर हि वनस्पती गुणकारी ठरते.

टीप : कृपया डॉक्टरांच्या सल्याशिवाय कोणतीही औषध सेवन करू नये.

 

laksh

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close