वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण करायचे आहे ..
मे महिन्यात प्रशिक्षणातील नवीन अपडेट्स तुम्हाला माहिती आहे का ...?

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण करायचे आहे ..
सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांसाठी सुवर्णसंधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा एप्रिल – मे २०२५ कालावधीत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. या संदर्भात नुकतेच राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शकांचे प्रशिक्षण पुणे येथे घेण्यात आले. 12 वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण करणारे शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी साठी व 24 वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण करणारे शिक्षक / मुख्याध्यापक हे निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी पात्र ठरतात. सध्यस्थितीत या प्रशिक्षणाची ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया दिनांक 21 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात आली असून ती 6 मे 2025 पर्यंत चालणार आहे.
सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांसाठी सुवर्णसंधी
दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा या प्रशिक्षणासाठी नवीन पत्र निर्गमित करण्यात आले. या पत्रानुसार राज्यामध्ये काही शिक्षक / मुख्याध्यापक हे दिनांक 30 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत 24 वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण करत आहेत आणि ते माहे एप्रिल 2026 पूर्वी सेवानिवृत्त होणार आहेत. अश्या शिक्षक / मुख्याध्यापकांचा सेवानिवृत्तीचा कालावधी लक्षात घेता ते दिनांक 30 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत सेवानिवृत्त होत असल्याने व सेवेची 24 वर्ष अहर्ताकारी सेवा पूर्ण होत असल्याने अशा शिक्षक व मुख्याध्यापक यांना नाव नोंदणी करण्यासाठीची सुविधा दिनांक 1 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण सर्वांसाठी नाव नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत दिनांक 6 मे 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिली आहे. सर्व पात्र शिक्षक व मुख्याध्यापकांनी निवडवेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणे बाबत सर्व विभागीय उपसंचालक, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी यांना राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक राहुल रेखावार यांनी पत्राद्वारे कळविले आहे.