सापांची शत्रू : सर्पगंधा (Rauvolfia)

सापांची शत्रू : सर्पगंधा (Rauvolfia)
हि एक सदाफुली या वनस्पती कुळातील बहुवर्षायू वनस्पती आहे. याला सर्पगंधा, बरुआ, धवल, चंद्रभागा, छोटा चंद आदी नावांनीही ओळखले जाते. बहुधा हि साल, वड, पिंपळ, ऐन, शिसवी, आंबा इत्यादी वृक्षाच्या सावलीत आढळून येते. हिचे लहान झुडूप 14 ते 15 सेंमीपर्यंत उंच वाढते. खोडाची साल फिकट तपकिरी, त्वक्षायुक्त व भेगाळ असते. यावर मार्च ते मे महिन्यादरम्यान पांढरी किंवा लालसर फुले येतात. यात रेसर्पीन हे अल्कलॉइड असते. चेतासंस्थेच्या विविध तक्रारींवर त्याचा वापर केला जातो. तसेच या वनस्पतीचा डांग्या खोकला, कॉलरा, रक्तदाब, अतिसार, आमांश यांसारख्या आतड्याच्या विकारांवर करतात. शरीरातील रक्तदाब व हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त वनस्पती आहे.
सापांची शत्रू :-
सापांना घरातून काढण्यासाठी, सर्पगंधा नावाची वनस्पती वापरली जाते. ही वनस्पती सापांचा शत्रू मानली जाते आणि साप त्याच्या आसपास फीरकत नसल्याचे आदिवासी लोकांचा अनुभव आहे. जर ही वनस्पती घराच्या आजूबाजूला लावली तर साप कधीच येणार नाहीत आणि सर्पदंश होण्याची भीती राहणार नाही. केवळ सापच नाही तर इतर विषारी प्राणीही या वनस्पतीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाहीत. ग्रामीण भागातील शेकडो लोक सातत्याने या वनस्पतीचा लाभ घेत आहेत. सर्पदंशात, सर्पगंधाची ताजी ठेचलेली पाने पायाच्या तळाखाली लावल्याने आराम मिळतो. आदिवासी लोकांमध्ये या वनस्पतीचा वापर मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतो.
वेड्यांचे औषध :-
सर्पगंधा हि वनस्पती केवळ सापांना दूर नेण्यासाठीच नाही तर उच्च रक्तदाब, निद्रानाश, वेडेपणा आणि उन्माद यासारख्या आजारांसाठी एक खात्रीशीर औषध आहे. पूर्वी याला ‘वेड्याचे औषध’ असेही म्हटले जात असे, कारण त्याचा वापर वेडेपणा बरा करू शकतो. हे कफ आणि वात देखील शांत करते. त्याच्या वापरामुळे पित्त वाढते आणि अन्नामध्ये रस निर्माण होतो. कीटकांच्या चाव्याच्या उपचारासाठी एक फायदेशीर विषनाशक म्हणून केले आहे.