सर्वात लांब प्रदक्षिणा करणारा प्रवासी – आर्टिक टर्न
सर्वात लांब प्रदक्षिणा करणारा प्रवासी – आर्टिक टर्न
आर्टिक टर्न पक्ष्याची लांबी लांबी 28-39 सेमी असून वजन सव्वाशे ग्राम पर्यंत राहते. पक्षी जरी छोटा असला तरी कामगिरी गिनीज बुकात दखल होणारी आहे. कारण एवढासा जीव जगाच्या वरच्या टोकापासून (आर्क्टिक प्रदेश) ते खालच्या टोकापर्यंत (अंटार्क्टिका) प्रवास करतो. हा पक्षी एका सरळ रेषेत प्रवास न करता भटकंतीसारखा प्रवास करतात. साधारण एका वर्षात 96 हजार किलोमीटर पर्यंतचा प्रवास केल्याच्या नोंदी जिओलोकेटर उपकरण द्वारे नोंदविल्या गेल्या आहे. आर्क्टिक टर्न पक्षी हे साधारणपणे 30 वर्षे जगतात. यांच्या उडण्याचा वेग ताशी ३५ ते ४० कि मी असतो. ते त्यांच्या आयुष्यात 24 लाख किलोमीटरहून अधिक प्रवास करतात. म्हणजे एक पक्षी साधारण पृथ्वीवरून चंद्रावर 3-4 वेळा अप डाऊन करू शकला असता. पृथ्वीवरील सर्वात लांब प्रदक्षिणा करणारा प्रवासी पक्षी म्हणून तो ओळखल्या जातो.
जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये जेव्हा उत्तर ध्रुवाकडे उन्हाळा असतो त्या वेळेला हे पक्षी उत्तर ध्रुवाच्या जवळ येतात. आइसलँड व शेजारच्या इतर देशांमध्ये हे प्रजनन करतात. महिन्याभरात पिले मोठी झाली की ते दक्षिण ध्रुवाकडे स्थलांतर करतात कारण तिकडे उन्हाळ्या असतो. आर्क्टिक टर्न हा एकमेव प्राणी आहे, ज्याच्या आयुष्यात दिवसाचा प्रकाश जास्त काळ असतो, कारण तो उन्हाळ्यात पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर राहतो त्यामुळे या पक्ष्याला सर्वात जास्त उन्हाळा अनुभवणारा पक्षी म्हटल्या जाते
फोटो सौजन्य – डॉ.चंद्रशेखर कुलकर्णी
अनोखा बंधन सोहळा
या पक्ष्यांतील प्रेमप्रकरण फार मजेशीर आहे. यांचा पहिल्या पाहणीचा कार्यक्रम उंच उड्डाणाने सुरु होतो, जेथे मादी नराचा उच्च उंचीवर पाठलाग करते आणि नंतर हळू हळू खाली उतरते. या डिस्प्लेनंतर “फिश फ्लाइट्स” येतात, जिथे नर मादीला मासे देतात. जमिनीवर प्रेमळपणामध्ये वाढलेली शेपटी आणि खालच्या पंखांनी फिरणे समाविष्ट असते. यानंतर, दोन्ही पक्षी सहसा उडतात आणि एकमेकांवर वर्तुळ करतात. त्यांनतर आयुष्य भराच्या बंधनाबाबत एकमत होते. यानंतर लवकरच वीण होते.
खूप छान , उपयुक्त, ज्ञानात भर घालणारी माहिती… शुभेच्छा.. 💐👍🏻
Thank You very much sir