Uncategorizedशैक्षणिक

शिक्षक प्रथमच अनुभवणार रियल टाइम प्रशिक्षण

राज्यात एकाच वेळेस दहा दिवसीय वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण

शिक्षक प्रथमच अनुभवणार रियल टाइम प्रशिक्षण

राज्यात एकाच वेळेस दहा दिवसीय वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण

शिक्षकाने आपल्या सेवेची 12 वर्ष किंवा 24 वर्ष पूर्ण केली असेल त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. यावर्षी प्रथमच शिक्षक वर्गात प्रत्यक्ष प्रशिक्षण घेता घेता त्याच वेळेस संपूर्ण राज्यात एकाच वेळेस राज्यस्तरीय ऑनलाईन चाचणी सोडविणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाच्या मार्फत राज्यात 2 जून ते 12 जून 2025 दरम्यान राज्यात एकाच वेळेस या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.

सेवेत पदार्पण दरम्यानची परिस्थिती व त्यानंतर झालेले स्थित्यंतरे यासाठी शिक्षकांनी सिद्ध होण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. नुकतेच राज्यस्तरीय प्रशिक्षण एससीआयआरटी पुणे येथे पार पडले असून दिनांक 26 ते 29 मे 2025 दरम्यान विभागस्तरिय/ जिल्हास्तरीय TOT प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले तज्ज्ञ मार्गदर्शक 2 जून ते 12 जून 2025 दरम्यान तालुकास्तरीय शिक्षकांना प्रत्यक्षात( ऑफलाईन स्वरूपात) वर्गात प्रशिक्षण देणार आहे.

रियल टाइम हायब्रीड प्रशिक्षण :-

कोरोना संपूर्ण ऑनलाईन स्वरूपात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण घेण्यात आले. यावर्षी हे प्रशिक्षण प्रत्यक्ष वर्गात ऑफलाईन स्वरूपात होणार असले तरी प्रत्यक्ष तासिका झाल्यावर रियल टाईम मध्ये चाचणी सोडवावी लागणार असल्याने सदर प्रशिक्षण हायब्रीड स्वरूपातील राहणार आहे. यापूर्वी प्रशिक्षणार्थींना ठराविक मुदतीत आपल्या सोयीने प्रशिक्षण करता येत होते मात्र यावेळी एकाचवेळी चाचणी लिंक उपलब्ध होणार असल्याने एखादा प्रशिक्षणार्थी वर्गात हजर नसल्यास तो प्रशिक्षणात अनुत्तीर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रशिक्षणातील विषय :-

या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण हक्क कायदा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, ऑनलाईन शिक्षण, सायबर सुरक्षा, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन, व्यवसाय शिक्षणसह ताणतणावाचे व्यवस्थापन, मूल्यमापन, कृतीसंशोधन आदी विस ते बावीस विषयांचा समावेश राहणार आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप :-

दहा दिवसीय प्रशिक्षणात प्रत्येक प्रशिक्षणार्थींना प्रत्येक तासिकेला हजर राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक दिवशी परिपाठ नंतर आदर्श शाळांवर चर्चा होणार असून दर दिवशी पाच तासिका होणार आहे. प्रशिक्षण पूर्व काळात पूर्व चाचणी (ऑनलाईन बहुपर्यायी) आणि उत्तर चाचणी (ऑफलाईन स्वरूपात लेखी) असणार आहे. प्रत्येक घटक नंतर 10 गुणांची बहुपर्यायी ऑनलाईन चाचणी होणार असून संपूर्ण राज्यात ही एकाच वेळी होणार असल्याने संपूर्ण राज्याचे वेळापत्रक सारखे राहणार आहे. विशेष म्हणजे यात किमान 50% गुण मिळविणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण दरम्यान मूल्यमापन :

प्रशिक्षण काळात दर तासिका नंतर 10 गुणाच्या चाचणी सह 10 स्वाध्याय पूर्ण करावे लागणार आहे. यातील 5 स्वाध्याय प्रत्यक्षात प्रशिक्षण दरम्यान वर्गात पाच घटकांवर आधारित गटनिहाय स्वाध्याय राहणार आहे. उर्वरित 5 स्वाध्याय प्रशिक्षण नंतर वैयक्तिक स्वरूपात पूर्ण करावे लागणार आहे. संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यावर शेवटच्या दिवशी 50 गुणांची लेखी चाचणी घेतली जाणार आहे. ज्यात रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या, टीपा लिहा, लघुत्तरी उपयोजनात्मक व मुक्तोत्तरी प्रश्नाचा समावेश राहणार आहे.

40 दिवसांचा कालावधी:-

प्रशिक्षण नंतर संपूर्ण मूल्यमापन प्रक्रियेतील स्वाध्याय व अहवाल लेखन 40 दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रत्येक स्वाध्यायास 10 गुण राहणार आहे तर नवोपक्रम/प्रकल्प/कृती संशोधन अहवाल साठी 50 गुण राहणार आहे. त्यानंतर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

गुणदान योजना :-

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण चाचणी साठी 100 गुण, स्वाध्याय साठी 100 गुण, लेखी चाचणी 50 गुण तर अहवाल लेखन साठी 50 गुण असे एकूण 300 गुणांवर आधारित संपूर्ण मूल्यमापन होणार आहे. प्रशिक्षण दरम्यान व नंतर अश्या दोन्ही मूल्यमापन प्रक्रियेत किमान 50% गुण मिळविणे अनिवार्य आहे. अन्यथा पुन्हा नव्याने नोंदणी करून व शुल्क भरून याच प्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे.

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close