एका क्लिकवर पालकांना कळणार पाल्यांची प्रगती
विद्या परिषद द्वारा निपुण महाराष्ट्र एप्सची निर्मिती

एका क्लिकवर पालकांना कळणार पाल्यांची प्रगती
विद्या परिषद द्वारा निपुण महाराष्ट्र एप्सची निर्मिती
जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांचे पालक हे शेतकरी, हातमजुरी करणारे, लघुद्योग ,व्यवसाय अथवा छोटी मोठी नोकरी करणारे असतात. आता असे सर्व पालक आपल्या शेतशिवार , नोकरीचे ठिकाण किंवा आपल्या लघुउद्योग करणाऱ्या ठिकाणहून मोबाईलच्या एका क्लिकवर आपल्या चिमुकल्यांची शैक्षणिक प्रगती बघू शकणार आहे. हि किमया साध्य केली महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे यांनी. विद्या परिषदेने ‘निपुण महाराष्ट्र SCERTM’ या नावाने नवीन मोबाईल एप्स विकसित केले असून नवीन शैक्षणिक वर्षात हा प्रयोग प्रत्यक्ष अनुभवाला मिळणार आहे.
कॉन्व्हेंट संस्कृती व ईतर अभ्यासमंडळाच्या शाळांमध्ये वर्गात आज काय शिकवले याची माहिती पालकांना समाज माध्यमांद्वारा शाळांकडून कळविले जाते. काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी यासाठी स्वतःच्या शाळांचे मोबाईल एप्स सुद्धा विकसित केले आहे. अगदी त्याच धर्तीवर आता महाराष्ट शासनाच्या जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगर पालिका तथा खाजगी अनुदानित शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना थेट एका क्लिकवर आपल्या पाल्यांची प्रगती बघायला मिळणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये पालकांची भूमिका महत्वाची आहे. शिक्षकांच्या परिश्रमाला पालकांच्या प्रयत्नांची जोड मिळावी तसेच शैक्षणिक सूचनांचे पालन पालकांनी करावे यासाठी हे एप्स विकसित करण्यात आले. जर पालकांनी याचे अनुपालन केल्यास निश्चितच पाल्यांच्या शिकण्याच्या गतीत वाढ होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत निपुण भारत उपक्रमामध्ये पुढील शैक्षणिक सत्रात मोठे ध्येय साध्य करायचे आहे. निपुण भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘निपुण महाराष्ट्र SCERTM’ अंतर्गत पथदर्शी चाचणी प्रयोग एप्रिल महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला. यामध्ये इयत्ता 2 री ते 5 वी च्या 99 % विद्यार्थ्यांची स्तर नोंदणी करण्यात आली तसेच 1 लाखच्या वर पालकांनी यामध्ये नोंदणी केली.
एप्स मध्ये नवीन काय ?
हा एप्स इयत्ता 1 ली ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आहे. गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाऊनलोड करावयाचा आहे. यामध्ये मुख्याध्यापक, पालक, शिक्षक तथा पर्यवेक्षकीय यंत्रणासाठी स्वतंत्र्य प्रवेश आहे. यु डायस क्रमांक असलेल्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती यामध्ये बघता येणार आहे. VSK चाटबॉटच्या माध्यमांतून शिक्षकांनी नोंदविलेला स्तर पालकांना बघता येणार आहे. तसेच पालकांना स्वतः विद्यार्थ्यांचा घरबसल्या सराव करून घेता येणार आहे.या सरावामुळे निश्चितच विद्यार्थ्यांचा अध्ययन निष्पत्ती साध्य होऊन शैक्षणिक स्तर उंचावू शकतो. विशेष म्हणजे पालकांना स्वतः हे एप्स कसे हाताळावे याकरिता मार्गदर्शन करणारे व्हिडीओ या मध्ये राहणार आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांतील शिक्षकांना वर्गनिहाय पालकांचे मोबाईल क्रमांक अद्यावत करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त यांचे द्वारे शैक्षणिक प्रशासनाला दिल्या आहेत. यामध्ये मुख्याध्यापकांनी स्वतःचा व शाळेतील सर्व शिक्षकांचा मोबाईल क्रमांक शालार्थ पोर्टल वर अद्यावत करावा लागेल.
भविष्यात काय ?
भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह शाळेत होणारे उत्सव, उपक्रम तथा पालकांसाठी सूचना सुद्धा तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घरबसल्या पालकांना बघायला मिळणार आहे. डिजिटल जगानुसार महाराष्ट्र शासनाच्या शाळा सुद्धा तंत्रस्नेही होत आहे.
निपुण महाराष्ट्र SCERTM ॲप्स ची गुगल प्ले स्टोअर लिंक