
शिक्षिकेसाठी रक्तदात्यांचा 18 तासाचा अखंड झरा
सुनिता पाटील यांचा धनोडी येथे अपघात
अमरावती
शनिवारी (दि. १२) सकाळच्या शाळेला जातांना चांदूर रेल्वे-वर्धा मार्गावरील सातेफळ फाट्यानजिक जिल्हा परिषद शाळा धनोडी येथील मुख्याध्यापिका सुनिता किरण पाटील यांचा अपघात झाला. श्रीमती पाटील चार चाकी वाहन चालवताना अचानक डुलकी आल्याने वाहनाचे नियंत्रण सुटून इलेक्ट्रिक पोलवर धडकली. या अपघातात सुनिता पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले.
वाहनाची धडक एवढी जबर होती की श्रीमती पाटील यांचा अखंड रक्तस्त्राव दीड दिवसनंतर सुरूच होता. सुनिता पाटील व त्यांचे पती किरण पाटील हे दोघेही शिक्षक संघटनेचे नेतृत्व करत असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. शनिवारी या अपघाताची माहिती वाऱ्यासारखी जिल्हा परिषद परिवारात पसरल्याने अनेकांनी अमरावती शहरातीलखाजगी रुग्णालयात धाव घेतली. शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षण विभागातील अनेक शिक्षक शिक्षिकांनी भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली.
मामाचे देहावसन व सासुंची शस्त्रक्रिया
आठ दिवस अगोदर सुनिता पाटील यांच्या सासूबाई लीलाबाई पाटील यांची मांडीमधील हाडाची शस्त्रक्रिया झाली. तसेच शुक्रवारी (दि.११) त्यांचे मामा पंजाबराव रडके यांचे निधन झाले. सतत झालेल्या दगदगीमुळे पुरेशी झोप न झाल्याने सकाळच्या सत्रात शाळेत जातांना हा अपघात घडल्याची चर्चा होती.

रक्तदानाचा अखंड झरा
या अपघातात रक्तवाहिन्यांना मार लागल्याने उशिरापर्यंत रक्तस्त्राव वर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते. त्यामुळे मित्रपरिवार भक्कम पाठीशी उभे राहत अखंड रक्तदान सुरू होते. सकाळी अधिव्याख्याता दीपक चांदुरे यांनी रक्तदानाला सुरुवात केल्यावर रात्री बारा पर्यंत रक्तदान सुरू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात पासून रक्त रक्तदान करायला सुरुवात झाली ती पण उशिरा पर्यंत सुरू होती. दुसऱ्या दिवशी नागपूर येथील हेडगेवार रक्तपेढी मधून क्रायो प्रेसिपितेड घटक आणावे लागले.

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
रुग्णाला सतत रक्तस्त्राव होत असल्याने किरण पाटील यांचे मित्र परिवार पुढाकार घेत तब्बल तीस पेक्षा अधिक रक्तदात्यानी रक्तदान करून आपल्या मित्रत्वाचा परिचय दिला. कवी अनंत राऊत यांच्या ‘मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा’ काव्याचा अनुभव यावेळी आला. रक्तदान करणाऱ्या मध्ये अधिव्याख्याता दीपक चांदुरे, विनोद वानखडे,संदीप झाडे,राजीव खिराडे, सूरज मंडे,गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे,गावील देशमुख, प्रमोद चोपडे, ऋषी कोकाटे, श्रीकांत खाजोने,दत्तप्रसाद भेले,सचिन अवघड, योगेश्वर काठोडे,निखिल सवाई,कुशल व्यास,रवींद्र शिखरे, प्रकाश बावनकुळे, मुजहिद फरात, हर्षल गिरपुंजे, प्रफुल्ल खोपे, सचिन इंजळकर, रितेश देशमुख, नंदकुमार जिरापुरे, योगीराज मोहोड, महेंद्र कोल्हे, स्वप्नील चव्हाण, सुशांत कविटकर,योगेश देशमुख, मंगेश उल्हे, मनोज श्रीखंडे आदींचा समावेश होता.

डॉ. प्रतिक वाढोकर ठरले दुसऱ्यांदा देवदूत
पाटील कुटुंबियांवर जेंव्हा जेंव्हा अडचण आली तेंव्हा त्यांच्या कुटुंबातील निष्णात डॉक्टर असलेले डॉ. प्रतिक वाढोकर हे दुवदेतुंच्या रूपाने समोर आले आहे. कोरोना काळात किरण पाटील यांची प्रकृती नाजूक अवस्थेत असताना त्यांना तातडीने ऑक्सिजन व्यवस्था करून पुणे येथे पाठविण्यात आले तेंव्हा पहिल्यांदा डॉ.प्रतिक वाढोकर यांनी देवदूत बनून किरण पाटील यांचा जीव वाचविला.
आता पुन्हा किरण पाटील यांच्या आयुष्यात पत्नीच्या अपघाताच्या रूपाने दुसऱ्यांदा गंभीर परिस्थिती असताना व स्थानिक डॉक्टरांना आशेचा किरण दिसत नसतांना डॉ.प्रतिक वाढोकार तातडीने पुण्याहून भल्या पहाटे अमरावतीत पोहचले. अमरावतीत रक्तातील क्लॉट क्लिअर करण्यासाठीक्रायो प्रेसिपितेड घटकाचा अमरावतीत पहिल्यांदा प्रयोग केला. विशेष म्हणजे याकरिता पुन्हा नागपूर येथील डॉ. शिशिर रावेकर यांचे सहकार्य मोलाचे ठरले. पाटील कुटुंबीय वर आलेले दुसरे संकट सुध्दा डॉ.प्रतिक वाढोकर यांच्या रूपाने तूर्तास टळले आहे.
प्रकृतीत सुधारणा
डॉ.प्रतीक वाढोकर पुणे, डॉ. शिशिर रावेकर नागपूर) व डॉ.सुयोग राठी (रिम्स अमरावती) यांच्या शर्तीच्या प्रयत्नाने सौ.सुनिता किरण पाटील यांची रक्तस्राव थांबविण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मित्रपरीवारांचे प्रेम तसेच त्यांचे सक्रिय प्रयत्न यामुळे सुनिता पाटील यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. दोन दिवस सातत्याने रक्तपुरवठा करणारे रक्त दाते व मित्र परिवारांचे मी आभार मानतो.
किरण पाटील,अमरावती