जळलेल्या जखमेवर वसा ची मायेची फुंकर
तब्बल ४६ दिवसांच्या विरहानंतर पिल्लांना मिळाली मायेची ऊब

जळलेल्या जखमेवर वसा ची मायेची फुंकर
तब्बल ४६ दिवसांच्या विरहानंतर पिल्लांना मिळाली मायेची ऊब
अमरावती शहरात नोव्हेंबर महिन्यात राहुल नगर परिसरात कुण्या अज्ञात व्यक्तीने रस्त्यावरील बेवारस मादी श्वानाच्या अंगावर गरम पदार्थ फेकला होता. ज्यात ती ३० टक्के जळाली होती. ११ नोव्हेंबरला जयदीप गावंडे यांच्या माहिती वरून शहरातील टीम वसाच्या ॲनिमल रेस्क्युअर सिद्धांत मते आणि प्यारा वेट शुभमनाथ सायंके यांनी तिला जळलेल्या स्थितीत रेस्क्यु करून मंगलधाम कॉलनी स्तिथ श्री गोरक्षण व्हेटर्नरी हॉस्पिटल ला दाखल केले. वसाच्या परिश्रमामुळे तब्बल 46 दिवसाच्या विरहानंतर श्वान पिल्लांना मायेची ऊब मिळाली आहे.

दिवाळी उत्सव काळात ही बेवारस मादी श्वान ८-१० दिवस तिच्या नवजात पिल्लांकडे फिरकली नव्हती. त्यामुळे स्थानिक प्राणीप्रेमींना तिची व पिल्लांची काळजी वाटत होती. जेव्हा ती श्वान मादी तिच्या पिल्लांच्या प्रेमापोटी परत आली तेव्हा तिच्या छातीच्या भागाला चांगलीच मोठी जळल्याची जखम होती. स्थानिक रहिवासीनी लगेच घटनेची माहिती प्राणी विषयक काम करणाऱ्या वसा संस्थेला दिली. रेस्क्यु टीम ने तिला वसा सेंटरला सोपविल्यानंतर डॉ. सुमित वैद्य आणि प्यारा वेट टीम ने यांनी त्या मादी श्वानावर योग्य उपचार केले. वसा ॲनिमल रेस्क्यु सेंटर येथे तिची तब्बल ४६ दिवस योग्य काळजी घेतल्या गेली. आज ती श्वान पूर्णपणे बरी झाल्या नंतर तिला तिच्या मूळ ठिकाणी सोडण्यात आले. आज ४६ दिवसा नंतर ती तिच्या पिल्लांना भेटली.

क्रुरतेला दिले प्रामाणिक सेवेने उत्तर
राहुल नगर परिसरात घडलेली ही घटना मानवीय नाही. या प्रकरणात कुणी ही समोर येवून आरोपी बद्दल माहिती दिली नाही, आणि स्थानिक परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने घटनेचे चित्रीकरण सुद्धा मिळाले नाही. वसा संस्थेने या क्रूर घटनेला प्रामाणिक सेवा करून श्र्वानाला मृत्यूच्या दाढेतून परत आणत समाजात एक प्राणी प्रेमाचा एक आदर्श निर्माण केला आहे.
प्राण्यांना त्रास दिल्यास होवू शकते कार्यवाही
रस्त्यावरील बेवारस किंवा घराच्या पाळीव प्राण्यांना जर कुणी मारत असेल, जखमी करत असेल, त्यांच्या राहत्या ठिकाणची नासधूस करत असेल, त्यांना जिवे मारन्याचा प्रयत्न करत असेल, त्यांची योग्य काळजी घेत नसेल किंवा श्वान – मांजरीच्या पिल्लांना खोका बंद करून जंगलात नेवून सोडत असल्यास अश्या व्यक्ती वर ‘द प्रिव्हेंशन ऑफ क्रुयेल्टि टू ॲनिमल ॲक्ट १९६०’ नुसार गुन्हा दाखल केल्या जावू शकते.
शुभमनाथ सायंके.सदस्य, प्राणी क्लेश समिती , अमरावती