Warning: foreach() argument must be of type array|object, bool given in /home/u114081366/domains/nisargdarpan.com/public_html/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/disable-comments.php on line 117

Warning: foreach() argument must be of type array|object, bool given in /home/u114081366/domains/nisargdarpan.com/public_html/wp-content/plugins/wp-user-profile-avatar/disable-comments.php on line 117
दखमा – एक नैसर्गिक अंत्यविधी  – nisargdarpan
संस्कृती विश्व

दखमा – एक नैसर्गिक अंत्यविधी 

दखमा – एक नैसर्गिक अंत्यविधी

ख्यातनाम उद्योगपती पद्मविभूषण रतनजी टाटा यांचा मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला. अतिश्रीमंत असून साधी राहणी व उच्च विचार व प्रत्येक भारतीयांसाठी टाटा समूहांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदानामुळे रतनजी टाटा यांनी अनेकांच्या मोबाईलमध्ये नाही तर हृदयात घर केले. त्यामुळेच बहुतांश भारतीयांनी ‘देवमाणूस‘ म्हणून त्यांची प्रतिमा समाज माध्यमावर प्रकाशित करत अनोखी आदरांजली अर्पण केली. रतनजी टाटा हे पारसी धर्माचे असल्याने मृत्युच्या निमित्याने या धर्मातील अंत्यसंस्कार हा विषय मोठ्या चर्चेचा ठरला.

 

पारसी धर्म पृथ्वी, जल व अग्नीला पवित्र मानतात त्यामुळे निसर्गातील पंचतत्व कुठल्याही माध्यमातून प्रदूषित होणार नाही याकडे त्यांचा कटाक्ष असतो. हिंदू धर्मात अग्नी, मुस्लीम व ख्रिस्चन धर्मात अंत्यसंस्कारसाठी दफनविधी करतात. पण पारसी धर्मातील अंत्यविधी पूर्णता निराळी असून ती निसर्गावर आधारित आहे. पारसी समुदायातील कोणत्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्यावर अग्नीसंस्कार न करता किंवा पृथ्वी अर्थात मातीत दफन न करता दखमामध्ये मृतदेह (शव) ठेवतात. दखमा म्हणजे पारसी धर्मातील स्मशानभूमी. यालाच टॉवर ऑफ सायलेन्स किंवा बाहुली, अंत्यसंस्काराची विहीर या नावानेही ओळखल्या जाते. हि स्मशानभूमी पूर्णता निसर्ग परिसरात असते. आशियातील पहिले दखमा कोलकत्ता येथे 1822 ते 1826 या कालावधीत तयार करण्यात आले. त्याकाळी परिसरातील राज्यात कोण्या पारसी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पार्थिवावर धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी कलकत्ता येथील दखमामध्ये आणल्या जायचे.

टॉवर ऑफ सायलेन्सची रचना :-

दखमाची रचना गोलाकार असते. जी आतल्या बाजूने पूर्णता मोकळ्या स्वरुपाची असते. गोलाकार उतरत्या विहिरीसारखी असणारी या बाहुलीत शव ठेवण्यासाठी गोलाकार 29 आरे सारखे छोटे मोठे खाणेची व्यवस्था असते. वरच्या भागात जड किंवा पुरुषांचे शव, मध्य भागात स्त्री शव व त्याखालच्या भागात लहान मुलांचे शव ठेवण्यासाठी रचना केली जाते. हि बाहुली पूर्णता आकाशाकडे मोकळी असते. निसर्गातील गिधाड, घार, कावळे व ईतर मृत शरीरावर आपली उपजीविका भागविणारे पक्षी यांच्या उदरनिर्वाहसाठी केलेली हि नैसर्गिक व्यवस्था आहे. केवळ पक्ष्यांमुळे शवाची संपूर्ण विल्हेवाट होत नसते तर सूर्यप्रकाश किंवा उष्णता यात महत्वाची भूमिका पार पडतात. मध्यभागी खोलगट विहिरासारखा भाग असून यात शवाचे मलमूत्र किंवा विघटनाच्या मार्गावर असलेले शरीराचे ईतर भाग नैसर्गिक पद्धतीने जमा होतात. वर्ष दोन वर्षातून काही शवांचे हाडांची पाहणी करून त्यांची विल्हेवाट केली जाते.

या बाहुलीसदृश्य खोलीला बाहेर एक मोठा लोखंडी दरवाजा उभारला असतो ज्यातून मृतदेह आतमध्ये नेला जातो. अंत्य संस्कार करतांना पारसी समाजातील रीतीरिवाजानुसार धार्मिक ग्रंथाचे पठन केल्या जाते. अंत्यसंस्कार करताना भिंतीला काही झरोके सुद्धा उपलब्ध असतात ज्यामधून उपस्थितांना हि प्रक्रिया बघता यावी. पारसी समाज हा सुखसमृध्द समाज आहे. कलकत्ता प्रमाणे मुंबईतील मलबार हिल सारख्या अतिउच्च भागात जंगल परिसरात टॉवर ऑफ सायलेन्स आहे.

कोलकत्ता येथील टॉवर ऑफ सायलेन्स

बदलते अंत्यसंस्कार :-

सध्या बदलत्या काळानुरूप पारसी समुदायातील लोकांमध्ये बदलाव बघायला मिळत आहे. पूर्वीची प्रचलित अंत्यसंस्कार पद्धती हि पूर्णता निसर्गावर आधारित असली तर दिवसेंदिवस गिधाड सारखे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. शवाची होणारी कुचंबना, प्रक्रियेला लागणारा दीर्घ कालावधी, बदलते हवामान, वाढते शहरीकरण यामुळे बदलत्या काळानुसार या समाजातील काही लोकांमध्ये बदलाव बघायला मिळत आहे. त्यामुळे रतनजी टाटा यांचे धार्मिक रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार न करता आधुनिक विद्युत दाहिनी मध्ये अग्नी संस्कार करण्यात आला. परंतु आजही अनेक पारसी लोक त्यांचे वंश परंपरागत पद्धती नुसार नैसर्गिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याला प्राधान्य देतात.

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close