
निसर्गरम्य हिंदी विश्वविद्यालय
महात्मा गांधीजीची कर्मभूमी वर्धा येथे देशातील महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वसलेले आहे. भारताच्या मध्य भूमीत देशाची सर्वार्धिक बोलली जाणारी हिंदी हि वैश्विक भाषा व्हावी, हिंदी भाषेत शिक्षणासह संशोधन व्हावे यासाठी 1997 साली या विद्यापीठाची स्थापना झाली. सुमारे 166 एकरात विस्तारलेले हे विद्यापीठ पंचटिळेवर उभारलेले आहे. पंचटिळा म्हणजे येथे छोट्या मोठ्या टेकड्या असून त्यांना गांधी हिल,कबीर हिल, विनोबा हिल,विवेकानंद हिल टागोर हिल असे नामकरण केले आहे.
निसर्गपूरक उपक्रम :-
नुकतेच भारत सरकारच्या शिक्षा विभाग द्वारा पर्यावरण विषयाचे कामाचे निमित्याने येथे आठवडाभर थांबण्याचा योग आला. विद्यापीठाचे निसर्ग सौंदर्य अबाधित राहावे तसेच हा परिसर प्रदूषणमुक्त रहावा म्हणून कोरोना काळात येथील अधिकारी व प्राध्यापक यांना विद्यापीठद्वारा 122 ई सायकलचे वितरण करण्यात आले. विद्यापीठातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बाह्य भागात 24 ठिकाणी ओला व सुखा कचरा असलेल्या मोठ्या सिमेंटच्या गोलाकार टाकी ठेवलेल्या आहेत. कार्यालयाच्या आतील भागात प्लास्टिकच्या बकेट ठेवल्या असल्याने कचऱ्याचे रुपांतर जैंविक खतात होऊन विद्यापीठात त्याचा विनियोग केला जातो. शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांनी येथे असणाऱ्या विविध वनौषधीचा अभ्यास करून झाडांना नाव दिलेले आहे. कचऱ्यासोबत विद्यापीठात पडणाऱ्या पावसाचे पाण्याचे नियोजन केले जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंग द्वारे इमारतीचे पाणी जमिनीत मुरविले जाते तर ईतर ठिकाणी पडणाऱ्या पाण्याचे दोन तळ्यात जलसंवर्धन केल्या जाते. परिसरात वड, पिंपळ, निंब, बांबू,लिंबू प्रजातीसारखी भरपूर वनसंपदा असल्याने पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याच विद्यापीठाच्या परिसरात राहून अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी वर्षभर मुक्काम करत विविध कोशची निर्मिती केली आहे. या विद्यापीठात उच्च शिक्षणासह केंद्रीय विद्यालय सुद्धा आहे. त्यामुळे बाहेरचे लोकांचे आवागमन आहे. मात्र परिसरात हॉर्न वाजविण्यावर प्रतिबंध आहे. विद्यार्थ्यांना शाळेत सोडणारे वाहन मुख्यता इलेक्ट्रिकवर आहे. परिसरात रवींद्रनाथ टागोर व ईतर थोर पुरुषांच्या नावाने बगिच्या उभारले आहे.



गांधी हिल :-
गांधी हिल येथील प्रसिध्द ठिकाण असून प्रत्येक अतिथी येथे नतमस्तक झाल्याशिवाय जात नाही. गांधीजी यांचे तीन बंदर, त्यांची चप्पल, चष्मा, शेळी हे ह्या हिलचे आकर्षणाचे केंद्र बिंदू आहे.
उपलब्ध अभ्यासक्रम :-
या विद्यापीठात बी.ए, बी.एड, एम.एस.डब्लू, बी.जे, एम.जे, एम.ए ( हिंदी, इतिहास, समाजशास्त्र, राजनीती विज्ञान) या विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, तसेच संगणकशास्त्र, पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया, अनुवाद, नाटक व रंगमंच आदी विषयातील पदविका आणि फ्रेंच, चीनी, जपानी, स्पॅनिश, सामाजिक नेतृत्व या विषयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
विद्यापीठाच्या इतर माहितीसाठी या लिंक ला क्लिक करावे.
https://hindivishwa.org/