वनस्पती जगत

अंधारातील चविष्ठ भाजी – कळवंची Momordica cymbalaria 

अंधारातील चविष्ठ भाजी – कळवंची

Momordica cymbalaria

पावसाळ्याच्या वातावरणात अनेक रानभाज्याची मेजवानीची संधी असते. यातील बहुतांश रानभाज्या ह्या दिवसाच्या प्रकाशात तयार करण्यात येतात. ,मात्र एक रानभाजी अशी आहे जिची दिवसाच्या प्रकाशात भाजी केली तर ती चवीने कडू होते या भाजीचे नाव आहे कळवंची. काकडी कुटुंबातील हि कंदवर्गीय वनस्पती जमिनीवर किंवा गवताच्या आधाराने आपली वाढ पूर्ण करते.

कडवंची वनस्पतीचे पान व फुल

पाने बाह्यरेषेत गोल किडनी आकाराची असतात, तळाशी खोल हृदयाच्या आकाराची असतात. फुलांचा रंग पांढरा ते पिवळा असतो. फुले लहान, एकलिंगी असतात. बिया 4.6 मिमी लांब, अंडाकृती आकाराच्या, काळ्या, गुळगुळीत आणि चमकदार असतात. कापसाच्या सरकीच्या बी प्रमाणे त्या दिसतात. जास्त पावसाळी प्रदेशात हि वनस्पती आढळत नाही. हि बारमाही वनस्पती असून उन्हाळ्यात सुप्त अवस्थेत राहते. या वेलीला जमिनीखाली एक फुटापर्यंत बटाटा सारखे कंद असतात.

जमिनीखाली येणारी बटाटा सारखे मुळे

औषधीय गुणधर्म : हि वनस्पती भरपूर प्रमाणात कल्शियमयुक्त असून त्रिदोष नाशक असल्याने कफ, वात, पित्त शमन करणारी आहे. पित्ताशयातील खडे, मोठ्या आतड्याचे विकार, मुळव्याध, कंबरदुखी, गुडघेदुखी, कावीळ, पोटाचे विकार, संधिवात आणि प्लीहा आणि यकृत रोगाच्या उप-तीव्र प्रकरणांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत. फळांचा रस आणि पानांचा चहा मधुमेह, मलेरिया, पोटशूळ, फोड आणि जखमा, संक्रमण, जंत आणि परजीवी, एमेनेगॉग आणि गोवर, हिपॅटायटीस आणि ताप यासाठी वापरला जातो. फळांचा लगदा, पानांचा रस आणि बियांमध्ये अँटीहेलिमेटिक क्रिया असते.

सरकीच्या प्रमाणे दिसणाऱ्या बिया

भाजी रात्रीच का ?

कळवंची रात्री दिव्याच्या प्रकाशात राहिल्यास तडकते किंवा उलते. त्यामुळे तिच्या चव व गुणधर्मात बदल होतो. म्हणून कळवंची ताजी भाजी खाणे हितकारक असतात. रात्रीच्या वेळी हि भाजी केल्यास कडू न लागता चविष्ठ होत असल्याचे या वनस्पतीचे संवर्धक व वनस्पती अभ्यासक अनिल चौधरी यांनी सांगितले.

दुर्मिळ वनस्पती :

शेतीतील तननाशके, विविध आधुनिक शेतकी अवजारे, तसेच शेताचा बांध कमी होत असल्याने हि वनस्पती सध्या अतिशय दुर्मिळ होत आहे. भाजी करणे सोबत हिचे नव्याने रोपण करून संवर्धन करणे आवश्यक असल्याचे वनस्पती अभ्यासक मिलिंद गिरधारी यांनी सांगितले.

सर्व छायचित्रे वनस्पती अभ्यासक श्री अनिल चौधरी यांची आहेत.

 

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close