सामान्य ज्ञान

गावोगावी पर्जन्यमापक का गरजेचा ?

गावोगावी पर्जन्यमापक का गरजेचा ?

आजही देशातील ६३ टक्के लोकांचे (९० कोटी लोकसंख्या) जीवन आणि अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे आणि शेती पाण्यावर आणि पाणी पावसावर अवलंबून आहे. पाणी नियोजनात सर्वांत पहिला टप्पा येतो पाऊस मोजण्याचा. काय यंत्रणा आहे आपल्या राज्यात पाऊस मोजण्याची? अधिकृतपणे तालुक्याला तीन (एका मंडलामध्ये एक) म्हणजेच ५० गावांसाठी शासनाचा एक पर्जन्यमापक. त्यावरचे रीडिंग पन्नास गावांसाठी ग्राह्य धरणार. हिवरे बाजारसारख्या पाणी नियोजन करण्यात अग्रेसर असणाऱ्या गावात तीन ठिकाणी पर्जन्यमापक आहेत. त्या गावात तीन ठिकाणच्या पावसामध्ये फरक असतो.

प्रत्येक गावात किमान एक तरी पर्जन्यमापक असला पाहिजे. त्यामुळे भविष्यातील पुढील बाबी सोप्या होईल. यामुळे गाव, शिवारातील पाण्याची आवक कळेल शिवाय गावात पाऊस किती पाऊस झाला हे मोजता येईल. अतिवृष्टी किंवा सरासरीपेक्षा कमी तेंव्हा अनेक शासकीय उपाययोजनांचा (उदा.पीकविमा) आढावा घेण्यासाठी हि आकडेवारी उपयोगी ठरेल. पेरणी किंवा दुबार पेरणी पूर्वी हिच आकडेवारी उपयोगाची ठरेल. संपूर्ण पावसाळ्यात किती पाऊस पडतो, गावातून किती पाणी वाहून जाते, त्यातले किती अडवू शकतो, किती मुरवू शकतो याकरिता हि आकडेवारी उपयोगी येते. उदा. कडवंची, खरपुडी (जि. जालना) यांसारखी उपक्रमशील गावं पावसाळा संपला कि पाण्याचे नियोजन करतात. यावरून किती पिके घ्यायची याचे नियोजन करणे सुलभ होते. अनेक गावांत लघुपाटबंधारे किंवा तलाव आहेत ते किती पावसाने भरतात, किती पावसाने पूर येतो याची नोंद ठेवता येते. याचा उपयोग संकट काळात नियोजनासाठी, नुकसान कमी करण्यासाठी होऊ शकतो. ओढ्याचा पूर, पुरामुळे बाजूच्या शेताचे नुकसान पूर्वसूचनेमुळे काही प्रमाणात टाळू शकते.

कमी पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये दोन पावसांतील अंतर, पावसाची तीव्रता, दिवसवार, आठवडावार आणि महिनावार पावसाचे मोजमाप हे काही वर्षे केल्यास वार्षिक शेतीचे वार्षिक नियोजन सोयीस्कर होईल. हवेतील आर्द्रता,त्यामुळे पिकावर पडणारे बुरशीजन्य रोग किंवा कीड, अशा इतर समस्यांची चाहूल आणि जाणीव पावसाची आकडेवारी समजली की लवकर होते. त्यावर आधारित खते, कीटकनाशके आणि इतर उपाययोजना करण्यास पुरेसा अवधी मिळतो.

सतीश खाडे,पुणे (9823030218)

—————————————————————–

पर्जन्य मापक घरी कसे बनवायचे त्याची ही लिंक.

https://youtu.be/tBQMELVUu2s

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close