हुशार शिकारी : भुरा बगळा (Indian Pond Heron)
हुशार शिकारी : भुरा बगळा (Indian Pond Heron)
पंधरा दिवसापूर्वी आमच्या शाश्वत कन्सेप्ट स्कूल मधील इयत्ता सहावीची सहल पेंचच्या जंगलात गेली. पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर विस्तारलेला आहे. पाच दिवसाच्या या सहलीमध्ये आम्ही वाघ, बिबट, सांबर, मगर, मोर, सुतार, जंगली वराह सारखे निरनिराळे प्राणी, पक्षी बघितले. या सहलीमध्ये आमच्या पूनम ठाकूर मैडमनी प्रत्येक विद्यार्थ्याला एका पक्षाबाबत माहिती गोळा करायला सांगितले. मला इंडियन पौंड हेरॉन अर्थात भुरा बगळा हा पक्षी दत्तक देण्यात आला.
भुरा बगळा या पक्ष्याला ढोकरी, आंधळा बगळा, कोक्या या नावाने ओळखल्या जाते. याचा आकार साधारण कावळ्या प्रमाणे होता. हा पक्षी ‘कॉक् कॉक्-कॉकर-कॉक असा आवाज काढतो. डबकी, ओढे, नाले, नद्या, गावतळी, बोडी, जलाशय, जंगलभागातील दलदली किंवा पाणथळी, खाजणं, चिखलटी, अशा पाणवठ्यांच्या अश्या ठिकाणी हा आढळून येतो. य़ा पक्ष्याच्या अगदी जवळ जाईपर्यंत हा पक्षी उडत नसल्याने याला हिंदीत ‘अंधा बगुला’ म्हणून ओळखतात. याला ‘पाँड्या’ या टोपण नावाने सुद्धा ओळखल्या जाते.आम्ही मित्र मैत्रिणी तर त्याला ढोंगी बाबा असे सुध्दा म्हणत होतो.
भुरा बगळा सर्वत्र आढळून येतो. हा पक्षी याचं भक्ष मोठ्या गंमतीदार पद्धतीने मिळवितो. भक्ष्याजवळ अलगद एक एक पाऊल टाकत जवळ जातो. त्यांनतर एका जागेवर पुतळ्याप्रमाणे ध्यानस्थ उभा राहतो. जेंव्हा भक्ष्य आपल्या कक्षेबाहेर नाही हि खात्री पटली कि, तो विशिष्ट क्षणी भाल्यासारखी चोच सपकन मारून भक्ष्य पकडतो. पाण्यावर जमणारे किडे, नाकतोडे, चतुराचा कोशेटा, झिंगे, बेडूक, मासे हे भुऱ्या बगळ्याचं खाद्य. हा पक्षी नैसर्गिक पाणवठ्यावर येऊन चिखलपान करणारी फुलपाखरंसुद्धा अत्यंत सफाईने पकडतो. बगळा आमिष देऊन मासेमारी करून शिकार साधतो. पर्यटक किंवा इतरानी टाकून दिलेल्या पाव,पोळी किंवा खाद्यपदार्थ मिळवतो आणि चोचीत धरून पाण्यात टाकतो. पाण्यात पडलेला पाव,पोळी खाण्यासाठी मासे जमले की, हा त्यांना पकडतो. पाणकावळ्यांच्या सारंगागारात भुरा बगळा आपलं घरटं बांधतो.
आर्या श्रीनाथ वानखडे
शाश्वत कन्सेप्ट स्कूल अमरावती.