जिल्हा परिषद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
दिनांक 14 ते 16 फेब्रुवारी : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आयोजन

दिनांक 14 ते 16 फेब्रुवारी : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आयोजन
जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांचे तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण
अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे दिनांक 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे केले आहे. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांचे अध्यक्षतेत हा उद्घाटन सोहळा होणार असून यावेळी विशेष अतिथी म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार हे राहणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी (अकोला), विशाल नरवाडे(बुलढाणा), वैभव वाघमारे (वाशिम), मंदार पत्की(यवतमाळ), उपआयुक्त (विकास) संतोष कवडे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ सचिव माधुरी चेंडके आदींची उपस्थिती राहणार आहे.
अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदा आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच दैनंदिन कामकाजात नवचैतन्य निर्माण होऊन अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील स्नेहबंध आणखी दृढ होण्यासाठी जिल्हा परिषद, अमरावती यांचे मार्फत विभागीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सव पहिल्या दिवशी सकाळी 9 वाजता उद्घाटन सोहळा व सामना होणार आहे. दोन दिवस सकाळी 11 ते सायंकाळी 6 दरम्यान सांघिक व वैयक्तिक मैदानी खेळ होणार असून सायंकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान खेळाडू आपल्या अंगी असलेल्या कराओके, हास्यजत्रा, समुहनृत्य, भावगीत, लोकगीत, एकलनृत्य, युगलगीत, सिनेगीत चे सादरीकरण करणार आहे.
दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता बक्षीस वितरण व समारोपीय समारंभ अमरावती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजीता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख,अमरावती क्रीडा विभाग उपसंचालक विजय संतान यांचे सह जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख व अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
विभागीय क्रीडा व सांस्कृतिक यशस्वी होण्याकरिता क्रीडा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, शिक्षणाधिकारी तथा क्रीडा सह सचिव बुद्धभूषण सोनोने, क्रीडा संयोजक तथा गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, क्रीडा सह संयोजक पंकज गुल्हाने यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विविध कर्मचारी संघटना पदाधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहे.