नवोपक्रममध्ये पाडवी,देसाई,चांदरकर,कच्छवे,देशपांडे प्रथम
राज्यस्तरीय नवोपक्रम पारितोषिक वितरण सोहळा

नवोपक्रममध्ये पाडवी,देसाई,चांदरकर,कच्छवे,देशपांडे प्रथम*
राज्यस्तरीय नवोपक्रम पारितोषिक वितरण सोहळा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे द्वारा दिनांक 6 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले सभागृह, विद्या परिषद पुणे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२३-२४ चा पारितोषिक वितरण सोहळा घेण्यात आला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेचे संचालक राहूल रेखावार (भाप्रसे) यांचे मार्गदर्शनात व सहसंचालक डॉ.शोभा खंदारे यांचे अध्यक्षतेत हा सोहळा घेण्यात आला. यामध्ये बबिता पाडवी, सचिन देसाई, समिर चांदरकर, कुसुम कच्छवे, प्रतिभा देशपांडे यांनी उत्कृष्ठ सादरीकरण करत गुणानुक्रमे प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
यावेळी मंचावर प्रामुख्याने विद्या परिषदेचे उपसंचालक डॉ कमलादेवी आवटे,डॉ.माधुरी सावरकर,ज्योती शिंदे,डॉ.ह.ना.जगताप,तसेच विभाग प्रमुख डॉ.दत्तात्रय थिटे,डॉ.अरुण सांगोलकर,योगेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.
राज्यभरात शिक्षण विभागात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षक व पर्यवेक्षकिय यंत्रणेसाठी पाच गटात हा उपक्रम राबविला जातो. राज्यभरातून एकूण ८११ स्पर्धकांनी या मध्ये सहभाग घेतला. या स्पर्धकांचे जिल्हा, विभागस्तरीय स्पर्धेनंतर राज्यस्तरीय सादरीकरण दिनांक ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात आले.
गट क्र.१ पूर्व प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक बबिता पाडवी (नंदुरबार),द्वितीय क्रमांक यास्मिन खान(आष्टी जि.बीड),
तृतीय क्रमांक प्रियांका थोरवडे(कराड जि.सातारा),
चतुर्थ क्रमांक ललिता असतकर(कारंजा,जि.वर्धा),
पाचवा क्रमांक अस्मिता ठिकणे (इचलकरंजी,जि.कोल्हापूर), उत्तेजनार्थमध्ये माधुरी कांबळे (कराड जि.सातारा),मंगला चव्हाण (रत्नागिरी),सादरीकरणमध्ये रोहिणी शिर्के (बारामती जि. पुणे) यांनी बाजी मारली.
गट क्र.२ प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून
प्रथम क्रमांक सचिन देसाई (भुदरगड जि.कोल्हापूर),द्वितीय क्रमांक कुंदा बच्छाव (नाशिक),तृतीय क्रमांक पल्लवी शिरोडे (हवेली जि.पुणे),चतुर्थ क्रमांक मृगया मोरे,(नांजा जि. रत्नागिरी),पाचवा क्रमांक राजकिरण चव्हाण (सोलापूर),
उत्तेजनार्थ मध्ये सुनिल कारंजकर (करविर,जि. कोल्हापूर),अरुण धकाते (माहूर जि. नांदेड),सादरीकरणमध्ये गजानन चौधरी (वसमत जि.हिंगोली),गणेश नाईक (मालवण जि. सिंधुदुर्ग), होमकर विठ्ठलराव (तुळजापूर जि. उस्मानाबाद) आदी यशस्वी ठरले.
गट क्र. ३ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक गटातून प्रथम क्रमांक समिर चांदरकर (मालवण जि. सिंधुदुर्ग),द्वितीय क्रमांक अजित पाटील (शिरोळ जि. कोल्हापूर),तृतीय क्रमांक रत्नप्रभा पवार(मिरज जि. सांगली), चतुर्थ क्रमांक अविनाश पाटील (धुळे),पाचवा क्रमांक भारती मराठे (नंदुरबार),उत्तेजनार्थमध्ये संतोष गार्डी( रत्नागिरी),युवराज पुकळे (कराड जि. सातारा), सादरीकरणमध्ये सुवर्णा कुळकर्णी (चिखली जि. बुलढाणा), सुमन बंडगर (ठाणे),लक्ष्मण पाटील (चंदगड जि. कोल्हापूर) हे यशस्वी ठरले आहेत.
गट क्र.४ विषय सहाय्यक, विषय साधनव्यक्ती व शिक्षकेत्तर कर्मचारी गटातून प्रथम क्रमांक कुसुम कच्छवे (मानवत जि. परभणी),द्वितीय क्रमांक मोतीराम जाधव (मनोरा जि. वाशिम)
तृतीय क्रमांक मनिषा कडव (मुंबई),चतुर्थ क्रमांक खालिदा जमादार (रत्नागिरी),पाचवा क्रमांक श्रीनाथ वानखडे (चांदूर रेल्वे जि. अमरावती),उत्तेजनार्थ चांगदेव सोरते (गडचिरोली), गजानन निवळे (ठाणे)सादरीकरणमध्ये गणपत पवार (खटाव जि. सातारा), मीनाक्षी खरटमोल (भातकुली जि. अमरावती) नरेश नवखरे (लाखनी जि. भंडारा),भारत बंडगर (सांगली) हे यशस्वी ठरले आहे.
गट क्र.५ अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी गटातून प्रथम क्रमांक प्रतिभा देशपांडे (वर्धा), द्वितीय क्रमांक डॉ.वनमाला पवार (नंदुरबार), तृतीय क्रमांक अश्विनी सोनवणे (भोर जि.पुणे), डाचतुर्थ क्रमांक मुकुंद दहिफळे ( संगमनेर जि. अहमदनगर), पाचवा क्रमांक संतोष दौंड (कर्जत जि. रायगड),उत्तेजनार्थमध्ये डॉ. गणपती कमेळकर (कागल जि. कोल्हापूर),सतीश दर्शनवाड (उमरखेड जि. यवतमाळ) सादरीकरणमध्ये भूपेश चव्हाण (हिंगणा जि. नागपूर),मधुमती सांगळे (यवतमाळ),डॉ. राजेंद्र महाजन (नंदुरबार) आदींनी क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व लेखक डॉ. ह.ना.जगताप,डॉ.संजीवनी महाले, डॉ.मंगेश घोगरे, डॉ. राजेंद्र भोईर, डॉ.अमोल डोंबाडे, डॉ.माधुरी ईसावे, डॉ. बाळगोंड पाटील, डॉ.प्रभाकर क्षीरसागर, डॉ.राजेश गोरे आदींनी भूमिका बजावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन विभाग प्रमुख डॉ.दत्तात्रय थिटे, संचालन डॉ.सतीश सातपुते, आभार डॉ.विद्या बोरसे यांनी मानले.
नवोपक्रम म्हणजे यश मिळविण्याचा मार्ग
एकच काम एकाच पद्धतीने काम केल्यास यश मिळत नाही.पण तेच काम वेगळ्या पद्धतीने केल्यास यश नक्की मिळते.नवोपक्रम म्हणजे यश मिळविण्याचा दुसरा मार्ग असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.ह.ना.जगताप यांनी उपस्थितांना सांगितले.