‘कोटा’ त साकारतेय पहिले सर्प उद्यान
‘कोटा’ त साकारतेय पहिले सर्प उद्यान
राजस्थान मधील कोटा प्रसिध्द आहे ते मेडिकल अभ्यासक्रमाच्या कोचिंग साठी. आता याच शहरात पहिले सर्प उद्यान उभारले जात आहे. विशेष म्हणजे १९ वर्षाच्या मेहनतीतून हे सर्प उद्यान पूर्णत्वास आले आहे. बुंदी रोडवरील हर्बल पार्कला लागून असलेल्या जागेवर केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) विविध प्रजातींचे साप येथे ठेवण्यास मान्यता दिली आहे.
कोटा येथील सर्पसंरक्षक डॉ. विनोद महोबिया यांनी सर्वप्रथम सर्प संवर्धनाचा ध्यास घेतला आणि त्यांच्या तलवंडी येथील निवासस्थानी विविध प्रजातींच्या सापांचे संवर्धन केले. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संरक्षणाच्या मागणीनंतर सन २००४ मध्ये सर्पसंवर्धन आणि संशोधनासाठी सर्प उद्यान तयार करण्याची योजना आखण्यात आली. यामध्ये सापांना संरक्षण देण्याबरोबरच सापांची माहिती लोकांना देणे आणि त्यावर संशोधन करणे या विषयावर काम सुरू करण्यात आले. प्रदीर्घ काळानंतर राज्य सरकारकडून १० कोटी रुपये यासाठी मंजूर केले.
जुलै २०२१ मध्ये यासाठी दोन मजली इमारतीचे बांधकाम असून ७.४२ कोटी रुपये खर्चून तळमजल्यावर ९२९० चौरस फूट आणि सर्प उद्यानाच्या पहिल्या मजल्यावर ६७०३ चौरस फूट बाधकाम झाले आहे. सरपटणाऱ्या विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसोबतच वन विभागाचे संशोधक साप, त्यांचे विष आणि विषविरोधी आणि त्यांच्या विषापासून बनवलेल्या इतर औषधांवरही संशोधनासह वैद्यकीय, विज्ञान वन संशोधक प्रशिक्षण राहणार आहे. त्यासाठी येथे लॅबसह इतर आवश्यक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.
३१ प्रकारचे देशी-विदेशी साप
याठिकाणी २९ प्रकारचे भारतीय आणि ४ अमेरिकन प्रजातींचे साप ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये इंडियन कोब्रा, कॉमन इंडियन क्रेट, रसेलचे व्हायपर, इंडियन पायथन, रॅट स्नेक, चेकर्ड कील ब्लॅक, बोन्झ बेक कील स्नेक, ट्रिंकेट स्नेक, कॅट स्नेक, ब्रँडेड कुकरी, वुल्फ स्नेक, रेड स्पॉटेड रॉयल, फोर्स्टन कॅट यासारखे बिनविषारी सापांचा समावेश आहे. साप, बँडेड रथरसारखे भारतीय साप ठेवण्यात येणार आहेत. विदेशी सापांच्या प्रजातींपैकी मेक्सिकन किंग स्नेक, मिल्क स्नेक, कॉर्न स्नेक आणि बॉल पायथन स्नेक या उद्यानात ठेवण्यात येणार आहेत.