शैक्षणिक

सुनेशी भोंगडे ‘चॅम्पियन ट्रॉफी’ची मानकरी

राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचा समारोप

  1. सुनेशी विनोद घोंगडे ‘चॅम्पियन ट्रॉफी’ची मानकरी

राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचा समारोप

विज्ञान प्रदर्शनीतील बक्षिसाची रक्कम वाढविणार – राज्यमंत्री पंकज भोयर

अमरावती, दि. १ : बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून संशोधन आणि प्रगतशीलता दिसून येते. या बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनीमधील सर्वोत्कृष्ट उपक्रमांना देण्यात येणारी रक्कम वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन समारोप प्रसंगी अमरावती येथे दिली.

52 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनी 2024-25 चे आयोजन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे दि. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीत करण्यात आले. या प्रदर्शनीचा बक्षीस वितरण तथा समारोपीय सोहळा आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे होते.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” या विषयाखाली भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. तीन दिवसात या प्रदर्षणीला एकूण 174 शाळांतील 11,108 विद्यार्थी व 709 शिक्षकांनी भेट दिली

समारोपीय कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, राज्य विज्ञान संस्था संचालक डॉ. हर्षलता बुराडे, उपसंचालक नीलिमा टाके, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य मिलिंद कुबडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. गजानन पुंडकर, ऍड. जयवंत पाटील पुसदेकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सुरेश खोटरे, सुभाष बनसोड, डॉ. विजय ठाकरे, राज्य विज्ञान संस्थेचे प्रवीण राठोड, डॉ. राजकुमार अवसरे, तेजराव काळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, डॉ. जयश्री राऊत आदींची उपस्थिती होती.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवण्यासाठी विज्ञान प्रदर्शनी हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या ठिकाणावरून असंख्य वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्तिमत्व घडली आहे. हे परिषदेचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रदर्शनीला विशेष महत्त्व आहे. राज्य वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी अग्रस्थानी आहे. संशोधन आणि प्रगतिशीलतेतून नवे शोध समोर येतील. हे नवे शोध समस्या निराकरणासाठी उपयोगी पडतील. तसेच यातून महत्त्वाचे तंत्रज्ञान पुढे येईल. आपला देश तरुणांचा देश आहे. या प्रदर्शनीमधील नवीन संकल्पना बौद्धिकतेला चालना देतील. यातून विकसित असे उपक्रम राबविण्यात येतील. यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. भविष्यातील वैज्ञानिक घडविण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले..

मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी “श्री शिवाजी शिक्षण संस्थेने एवढ्या भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करून अमरावती शहराच्या विज्ञान क्षेत्रात महत्वपूर्ण भर घातली आहे,” असे गौरवोद्गार काढले.

अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन देशमुख यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाच्या टीमचे कौतुक करताना, “शासनाने श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयावर सोपविलेली जबाबदारी महाविद्यालयाने अत्यंत यशस्वीपणे पार पाडली आहे,” असे नमूद केले.

या विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मान्यवरांचे हस्ते शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन कोरपे, तसेच समन्वयक डॉ. पंकज नागपुरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. जयश्री धोटे आणि डॉ. दिनेश खेडकर यांनी केले, तर आभार डॉ. हर्षलता बुराडे यांनी मानले.

बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात प्राथमिक आणि माध्यमिक गटातून सर्वाधिक गुण मिळवत ‘चॅम्पियन ट्रॉफी’ जिंकणाऱ्या कु. सुनेशी विनोद भोंगडे, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा, पंचाळा, जिल्हा चंद्रपूर हिला इकोफ्रेंडली बायोडीग्रेडीबल पॉट्स या प्रतीकृतीसाठी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध विभागांतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहनपर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

विज्ञान प्रदर्शन निकाल खालील प्रमाणे 

उच्च प्राथमिक गट वर्ग (6 ते 8) सर्वसाधारण :-प्रथम क्रमांक – सुनेशी भोंगळे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पंचाळा ता. राजुरा जिल्हा चंद्रपूर. द्वितीय क्रमांक – अक्सा रियाज जमादार, उर्दू विद्यामंदिर खिद्रापूर ता. शिरोड जिल्हा कोल्हापूर. तृतीय क्रमांक- प्रत्युष माने, जे इ एम शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जुन्नर जिल्हा पुणे. चतुर्थ क्रमांक- क्रीशा सावंत, इंग्लिश मिडीयम स्कूल नेरळ जिल्हा रायगड. उत्तेजनार्थ – 1)स्पंदन धामणे, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरी. 2) चैतन्य ढुमणे, अग्रग्रामी कॉन्व्हेंट स्कूल म्हसाळा जिल्हा वर्धा. 3) निर्जा कुंभार, श्री भैरवनाथ हायस्कूल महिने जिल्हा कोल्हापूर

माध्यमिक व उच्च माध्यमिक गट ( वर्ग 9ते 12)

प्रथम क्रमांक – संस्कार देशमुख, गांधी माध्य विद्यालय परभणी. द्वितीय क्रमांक – सागर बोंबले, मानसिंग भाऊ पवार ज्यू कालेज, ढोरकोन पैठण छ. संभाजी नगर. तृतीय क्रमांक दिनेश वाघमारे, श्री मक्कप्पा कोनापूरे हायस्कूल आहेरेवाडी जि. सोलापूर. चतुर्थ क्रमांक तन्वीर जमील तांबोळी महाराष्ट्र विद्यालय, बार्शी सोलापूर. उत्तेजनार्थ बक्षीस – ओमतेज उल्हास तारी प्रगत विद्यामंदीर मालवण,सिंधुदुर्ग. ऋषिकेश चव्हाण, आनंद इंग्लिश स्कूल सातारा.मनीष जड्यार न्यू इंग्लिश स्कूल खंडोंश्री रत्नागिरी

प्राथमिक विद्यार्थी (दिव्यांग गट):-

प्रथम क्रमांक – रेहान दारव्हाणकर, केशवनगर विद्यालय नागपूर. उत्तेजनार्थ – मृणाल पुणेकर, शेवंताबाई बंडोजी चव्हाण शाळा धायरी जिल्हा पुणे

प्राथमिक विद्यार्थी (आदिवासी गट):-

प्रथम क्रमांक- जोसेफ नाईक, अनुदानित आश्रम शाळा नंदुरबार. उत्तेजनार्थ भारती शास्त्रकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हरदोना जिल्हा चंद्रपूर

माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (दिव्यांग गट) :-प्रथम क्रमांक- पुष्पा वाकचौरे, न्यू इंग्लिश स्कूल कवडरा जिल्हा नाशिक. उत्तेजनार्थ – ऋत्विक मडोळे, जय स्वामीनारायण विद्यालय समुद्राल उमरगा जिल्हा धाराशिव

माध्यमिक व उच्च माध्यमिक (आदिवासी गट ):- 

प्रथम क्रमांक- पूनम कावर, शासकीय आश्रम शाळा चणकापूर जिल्हा नाशिक. उत्तेजनार्थ सिद्धार्थ देशमुख श्री स्वामी समर्थ महाविद्यालय राजुरा, अहिल्यानगर

प्राथमिक शिक्षक गट (शैक्षणिक साहित्य):-

प्रथम क्रमांक – गायत्री पुरी, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा बांबुर्डी जिल्हा सातारा. द्वितीय क्रमांक- स्वाती बडगुजर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपराळा जळगाव. उत्तेजनार्थ – डी.के आडक, पूर्व माध्यमिक हिप्परगा जिल्हा लातूर.अनुराधा वातकर, प्रिन्स शिवाजी विद्यालय राजारामपुरी जिल्हा कोल्हापूर. गंगाधर गायकवाड, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धोतीवाडा नागपूर.

माध्यमिक शिक्षक गट (शैक्षणिक साहित्य):-

प्रथम क्रमांक – संतोष देशमाने, राजगड विद्यालय वाजीगर जिल्हा पुणे. द्वितीय क्रमांक शुभांगीनी हेडाऊ, न्यू इंग्लिश हायस्कूल वरुड जिल्हा अमरावती. उत्तेजनार्थ – मुकेश ठाकूर, सेठ जी एच हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई. बापूराव शिंदे, जिल्हा परिषद हायस्कूल आसगाव जिल्हा भंडारा, प्रमोद सरोदे, श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय शेंदुर्णी जिल्हा जळगाव

प्रयोगशाळा गट (शैक्षणिक साहित्य):-

प्रथम क्रमांक – गणेश बदकल, लोक विद्यालय चालबर्डी जिल्हा चंद्रपूर. द्वितीय क्रमांक- कैलास नांद्रे आश्रमशाळा कचरा, जिल्हा नंदुरबार. उत्तेजनार्थ विजय पाटील, ज्ञानदीप विद्यामंदिर वसई जिल्हा पालघर. सूर्यकांत चव्हाण, खेमराज मेमोरियल स्कूल बांदा जिल्हा सिंधुदुर्ग. सुमंजली तेडू, श्री सनातन धर्म विद्यालय जुनिअर कॉलेज चेंबूर मुंबई.

मुख्य संपादक : श्रीनाथ वानखडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close