देशी वृक्षघरांचे अनोखे गावं -मान्याची वाडी
देशी वृक्षघरांचे अनोखे गावं -मान्याची वाडी
सातारा जिल्ह्यातील पुस्तकाचं गावं म्हणून भिलार हे सर्वत्र चर्चेत आले तसेच आता पाटण तालुक्यातील जेमतेम ४२५ लोकसंख्या असलेले ‘मान्याची वाडी’ हे गावं नावारूपास येत आहे. त्याचे कारण म्हणजे या गावातील प्रत्येक घराला आता नव्याने देशी वृक्षाच्या नावाने मानकरण करण्यात आले आहे. गावातील सर्व २१२ घरांना देशी प्रसादांच्या वृक्षांची नावे देऊन नामकरण सोहळा एकाच वेळी संपन्न केला.
नाविन्यपूर्ण विविध अंगी उपक्रम राबवणारे ग्राम म्हणून राज्यात व देशपातळीववरील मान्याची वाडी गावाने विविध क्षेत्रातील सुमारे ६२ पुरस्कार मिळालेले आहे. यात विविध स्वच्छता अभियान, सौर उर्जा प्रकल्प, तंटा मुक्त अभियान, जलसंचय, आदींचा समावेश आहे. येथील ग्रामस्थांनी ग्रामविकासात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे योगदान दिले राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना उपक्रम ची प्रभावी अंमलबजावणी करत हे गाव दिशादर्शक ठरले आहे . माझी वसुंधरा अभियानात गावाने भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर काम करताना वृक्ष लागवड व संवर्धनाची यशस्वी सांगड घातली.
आता गावकऱ्यांसह ग्राम विकासाच्या अभ्यासासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना देशी प्रजातींच्या वृक्षांची ओळख व्हावी, देशी वृक्षांबाबत प्रेम निर्माण व्हावे, म्हणून प्रत्येक घरासमोर आंबा, चिकू, दालचिनी, काजू, पेरू, जांभूळ, फणस,असे पाचशेहून अधिक वृक्ष लावली आहे. ज्या घरासमोरचे वृक्ष त्या घराला त्याचे नाव देऊन त्या वृक्षाची उपयुक्तता त्याची शास्त्रीय माहिती देणारे फलक ही वृक्ष शेजारी लावण्यात आले आहे.ग्रामपंचायत च्या ८ अ वर सुद्धा त्याची नोंद राहणार आहे.
केवळ ७ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायत ने सलग तीन निवडणुकीत बिनविरोध सत्ता प्रस्थापित केली आहे.या दरम्यान ६२ पुरस्कार वर आपले नाव नोंदविले आहेत.कोरोना काळात सर्व घरांवर विविध अभ्यासक्रमाची माहिती, निर्मल ग्राम, स्वच्छता अभियान,सौर उर्जा प्रकल्प, पर्यावरण ,तंटामुक्त अभियान, गावात टू व्हीलर चार्जिंग स्टेशनसुविधा उपलब्ध असून गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. गावात १०० करवसुली असून पक्षांसाठी भोजनालय आहेत. संपूर्ण गावं गटार मुक्त असून या गावात मुलीच्या जन्मस्वागतासाठी ५१००० हजार ठेव पावती योजना आहे. विशेष म्हणजे पुरुष नसबंदीसाठी येथे करमाफी असून संपूर्ण गावात वाय फाय सुविधा आहे. अलीकडे औषधी वनस्पतीसह मूळ देशी प्रजातींच्या वनस्पतींची माहिती ही दुर्मिळ होत आहेत. नव्या पिढीला अशा वनस्पती वृक्षांची ओढ व्हावी, ओळख व्हावी, औषधीसाठी उपयोग व्हावा यासाठीच हा उपक्रम असल्याचे या गावचे सरपंच रवींद्र माने यांनी सांगितले.